जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या', सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र सरकारने Facebook कडे मागितली माहिती

'अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या', सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र सरकारने Facebook कडे मागितली माहिती

'अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या', सुरक्षेच्यादृष्टीने केंद्र सरकारने Facebook कडे मागितली माहिती

केंद्र सरकारने फेसबुककडून (facebook name change) त्याच्या अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती मागितली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : केंद्र सरकारने फेसबुककडून (facebook name change) त्याच्या अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती मागितली आहे. सरकारने याविषयी (Information requested by the Central Government from Facebook) फेसबुकला एक पत्र लिहून याबातची माहिती मागितली आहे. भारतातील फेसबुक युजर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने सरकारने हे पाऊल उचललं आहे. अमेरिकेतील एका रिपोर्टनुसार, फेसबुकवर फेक न्यूज, हिसाचाराला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी सामग्री सातत्याने पसरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर Facebook Users च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने (Algorithms and processes) हा निर्णय घेतला आहे. परंतु सरकारने मागितलेल्या या स्पष्टीकरणावर फेसबुकने अद्यापही कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

भारतात फेसबुक युजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात - भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ही कोट्यवधींच्या घरात असून (Facebook users in India) सरकारने जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार देशात 53 कोटी लोक whatsApp, 41 कोटी लोक Facebook आणि 21 कोटी युजर्स Instagram चा वापर करतात. त्यामुळेच आता डेटा आणि सोशल मीडियाच्या या विषयाला गंभीरतेने घेत सरकारने या वर्षी नवीन आयटी नियम जारी केले होते.

तुमचं Adhaar Card परवानगीशिवाय कुठे वापरलं जातंय का? एका मिनिटात असं तपासा

नव्या IT नियमांनुसार आता ट्विटर किंवा फेसबुक या कंपन्यांना सरकारला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. मागील काही वर्षात जगभरात फेसबुकवर युजर्सच्या डेटाचोरीचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे भारतात नव्या आयटी नियमांनुसार फेसबुककडून त्यांच्या अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती मागवण्यात आली असून आता त्यावर फेसबुक काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात