मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चंद्रावर अब्जावधी माणसांना पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध? नवीन संशोधनातील निष्कर्ष

चंद्रावर अब्जावधी माणसांना पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध? नवीन संशोधनातील निष्कर्ष

Photo: Pixabay (File Photo)

Photo: Pixabay (File Photo)

चंद्रावर काय काय आहे, तिथं माणूस जिवंत राहू शकेल का, त्यासाठी आवश्यक प्राणवायू तिथं असेल का, तिथलं नेमकं वातावरण कसं आहे, तिथली माती कशी आहे असे असंख्य प्रश्न किती तरी वर्षांपासून मानवाला पडत आले आहेत.

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : चंद्रावर (Moon) जाण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल. माणसानं असंख्य प्रयत्न करून हे स्वप्न प्रत्यक्षातही आणलं आहे. चंद्रावर काय काय आहे, तिथं माणूस जिवंत राहू शकेल का, त्यासाठी आवश्यक प्राणवायू तिथं असेल का, तिथलं नेमकं वातावरण कसं आहे, तिथली माती कशी आहे असे असंख्य प्रश्न किती तरी वर्षांपासून मानवाला पडत आले आहेत. यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधलीही आहेत. अवकाश संशोधनात पूर्वीपेक्षा आता अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यासाठी प्रचंड पैसाही खर्च केला जातो. चंद्रावर किती प्रमाणात ऑक्सिजन (oxygen On Moon) आहे याविषयीच्या संशोधनाचं एक वृत्त 'टीव्ही 9'नं नुकतंच दिलं आहे. ऑस्ट्रेलियाची अंतराळ संस्था आणि अमेरिकेतल्या नासामध्ये ऑर्टेमिस मोहिमेंतर्गत एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ऑस्ट्रेलियात तयार केलेलं रोव्हर अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

पृथ्वीवरच्या जमिनीतल्या अनेक खनिजांमध्ये ऑक्सिजन आढळतो. पृथ्वीवर आढळणारे जे खडक आहेत त्याच खडकांनी चंद्रही निर्माण झाला आहे असं म्हटलं जातं. सिलिका, ॲल्युमिनियम, लोखंड आणि मॅग्नेशिअम ऑक्साइडसारखी खनिजं चंद्रावर जास्त प्रमाणात आहेत. या सर्व खनिजांमध्ये ऑक्सिजन असतो; पण आपल्याला श्वासोच्छ्वासासाठी आवश्यक असलेल्या रूपात तो नसतो. चंद्रावर ही खनिजं थोडी वेगळ्या रूपात आढळतात. कठीण खडक, धूळ, दगडगोटे, तसंच अन्य पृष्ठभागांना झाकणारे दगड यांचा यामध्ये समावेश आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हजारो वर्षांपासून झालेल्या उल्कापातामुळे हे सगळं तिथं जमा झालं आहे. काही जण चंद्राच्या वरील पृष्ठभागावर माती असल्याचं मानतात; पण माती केवळ पृथ्वीवरच असते असं म्हटलं जातं.

या मातीच्या मूळ रूपावर जगणाऱ्या जीवांच्या एका विशाल साखळीद्वारे लाखो जीवांद्वारे हे बनलं आहे. पृथ्वीवरची माती विशेषत: भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हे सगळं त्यांच्या मूळ आणि अस्पर्शी रूपात अस्तित्वात आहे. चंद्राचा पृष्ठभाग जवळपास 45% टक्के ऑक्सिजननं बनला आहे; मात्र हा ऑक्सिजन वर सांगितल्याप्रमाणे खनिजयुक्त आहे. या अत्यंत मजबूत बंधांना तोडण्यासाठी आपल्याला प्रचंड ऊर्जा, शक्ती वापरण्याची गरज आहे.

अर्थात चंद्रावर स्वत:चं वेगळं असं वातावरण आहे. हे वातावरण अत्यंत विरळ आहे आणि हायड्रोजन, निऑन आणि ऑर्गनने बनलेलं आहे. मानवासारखे सस्तन प्राणी ज्या ऑक्सिजनवर अवलंबून असतात, हे त्या प्रकारचं वातावरण नाही. या वातावरणाचा विचार केला तर चंद्रावर भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आहे. फक्त तो वायू रूपात नाही. त्याऐवजी चंद्राला झाकणाऱ्या खडकांचा थर आणि प्रचंड धूळ, ज्याला रेजोलिथ म्हटलं जातं, त्यामध्ये हे अडकलेलं आहे. आपण या थरांमधून ऑक्सिजन काढू शकलो तर चंद्राचं वातावरण मानवी जीवनाला आवश्यक असं होऊ शकेल का असा विचार केला जात आहे.

या थरांतून तो खरोखरच वेगळा करता आला तर भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो. आपण चंद्रावरच्या कठीण खडकांमध्ये असलेल्या ऑक्सिजनकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रेजोलिथचाच विचार केला तर आपल्याला काही निष्कर्ष काढता येऊ शकतो. चंद्राच्या रेजोलिथवर प्रत्येक घन मीटरमध्ये सरासरी 1.4 टन खनिजं उपलब्ध असतात. त्यामध्ये जवळपास 630 किलोग्रॅम ऑक्सिजन असतो. माणसाला जिवंत राहण्यासाठी श्वास घेण्यासाठी एका दिवसात जवळपास 800 ग्रॅम ऑक्सिजनची आवश्यकता असते, असं नासाचं म्हणणं आहे. म्हणजेच विचार केला तर 630 किलो ऑक्सिजन एका व्यक्तीला दोन वर्षं (किंवा त्याहीपेक्षा जास्त) जिवंत राहण्यासाठी पुरेसा आहे.

हे वाचा - 36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

आता चंद्रावर रेजोलिथची सरासरी खोली जवळपास 10 मीटर आहे आणि आपण त्यातून सर्व ऑक्सिजन काढून घेतला, तर चंद्राच्या पृष्ठभागावरील दहा मीटर भागावर पृथ्वीवरच्या सर्व म्हणजे आठ अब्ज लोकांना जवळपास 1,00,000 वर्षांपर्यंत श्वास घेण्यासाठी हा ऑक्सिजन पुरू शकतो. आता आपण ऑक्सिजन किती प्रभावीपणे काढून घेऊ शकतो आणि त्याचा किती प्रभावी उपयोग करू शकतो यावर हे सगळं वलंबून आहे. अर्थातच, हा आकडा जादुई वाटतो. आपण आपला हा निळा ग्रह अर्थात चंद्र आणि विशेषत: त्याच्या मातीच्या संरक्षणासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणं आवश्यक आहे. या मातीमुळेच आपण आपलं आयुष्य सुखानं जगू शकतो.

हे वाचा - Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण कोणालाच माहीत नाही

लहानपणापासून विविध रूपांत पाहिलेल्या या चंद्रावर जाण्याचं अनेकांचं स्वप्नं पूर्ण होईलही; पण तिथे राहण्याचं, जगण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आता हे अखंड प्रयत्न सुरू आहेत.

First published:

Tags: Moon, Oxygen supply