मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारतात TikTok ची पॅरेंट कंपनी Bytedance चे बँक account freeze; काय आहे कारण...

भारतात TikTok ची पॅरेंट कंपनी Bytedance चे बँक account freeze; काय आहे कारण...

भारत सरकारने आता टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सविरुद्धही (ByteDance) कठोर पावलं उचलली आहेत. टॅक्स चोरीच्या आरोपात सरकारने बाईटडान्सचे भारतातील सर्व अकाउंट्स फ्रीज केले आहेत.

    नवी दिल्ली, 31 मार्च : भारतात टिकटॉक (TikTok) बॅन झाल्यानंतर भारत सरकारने आता टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सविरुद्धही (ByteDance) कठोर पावलं उचलली आहेत. टॅक्स चोरीच्या आरोपात सरकारने बाईटडान्सचे भारतातील सर्व अकाउंट्स फ्रीज केले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर कंपनीने मुंबई हायकोर्टत (Mumbai High Court) धाव घेतली आहे. तसंच सरकारच्या निर्णयावर कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय सरकारचा हा आदेश लवकरात लवकर फेटाळण्याची मागणी केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सांगितलं की, सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठं नुकसान झालं आहे. कंपनीने जानेवारीमध्ये भारतात आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. भारतात अद्यापही बाईटडान्सचे 1300 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी अधिकतर लोक परदेशातील ऑपरेशन हँडल करत आहेत, ज्यात कंटेंट मॉडरेशनही सामिल आहे. पैसे काढण्याची परवानगी नाही - रॉयटर्सला या प्रकरणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 मध्ये बाईटडान्सच्या भारतीय यूनिट आणि सिंगापूरमध्ये असलेली बाईटडान्सची पॅरेंट कंपनी TikTok Pte Ltd मध्ये झालेल्या ऑनलाईन जाहिरात करारामध्ये टॅक्स अधिकाऱ्यांना टॅक्स चोरीची माहिती मिळाली होती.

    (वाचा - बायको, नवरा किंवा मित्र, कुणीही असो; आता वापरता येणार नाही एकच Netflix पासवर्ड)

    त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या Citibank आणि HSBC बँकेतील अकाउंट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दोन अधिकाऱ्यांनी, कंपनीला टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबरवरुन लिंक असलेल्या कोणत्याही बँक अकाउंटमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले.

    (वाचा - देशात प्रत्येक तिसरं DL बनावट; तुमचं Driving Licence खरं की खोटं? असं ओळखा)

    खात्यात केवळ 10 मिलियन डॉलर - बाईटडान्सने या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्याची सुनावणी मुंबई हायकोर्टात होईल. यामध्ये बाईटडान्सने इंडियाने असा युक्तिवाद केला आहे की, त्यांच्या खात्यात केवळ 10 मिलियन डॉलर आहे, त्यामुळे अशाप्रकारची स्थगिती कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे आणि या अकाउंट फ्रीजमुळे, या स्थगितीमुळे वेतन आणि टॅक्स भरणं कठिण होईल, असं बाईटडान्सने म्हटलं आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: India, International, Mumbai fire station, Social media viral, Tech news, Technology, Tik tok, Tiktok

    पुढील बातम्या