नवी दिल्ली, 30 मार्च : Netflix वापरताना अनेक जण ज्याच्याकडे सब्सक्रिप्शन असतं, त्याचा पासवर्ड इतर लोक वापरताना दिसतात. पासवर्ड इतरांशी शेअर झाल्यामुळे नेटफ्लिक्सवर येणारे शोज, मूव्ही सहजपणे पाहता येतात. परंतु आता असं करता येणार नाही. कारण नेटफ्लिक्स आता अशा टेक्नोलॉजीवर काम करत आहे, ज्यामुळे एका आयडीवर तोच युजर नेटफ्लिक्स पाहू शकतो, ज्याने त्याचं सब्सक्रिप्शन घेतलं आहे. त्यामुळे जे इतरांचा पासवर्ड वापरुन नेटफ्लिक्स पाहतात त्यांच्यासाठी हा मोठा झटका ठरू शकतो.
लॉकडाउन काळात नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांच्या संख्येत भारतात मोठी वाढ झाली. जबरदस्त परफॉर्मेंसनंतर आता नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर लगाम लावण्याची घोषणा केली आहे. ज्या युजरकडे सब्सक्रिप्शन नसेल, तो इतरांचा पासवर्ड घेवून नेटफ्लिक्स पाहू शकत नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. सध्या नेटफ्लिक्सची ही नवी टेक्नोलॉजी टेस्टिंग फेजमध्ये आहे. कंपनीने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
नेटफ्लिक्सच्या अटींमध्ये स्पष्ट करण्यात आलं की, नेटफ्लिक्स अकाउंट वैयक्तिक आणि नॉन-कमर्शियल वापरासाठी आहे. त्यामुळे यासाठी वापर होणारा पासवर्ड कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केलं जाऊ शकत नाही.
युजर प्रायव्हसी धोक्यात -
सब्सक्रिप्शन असणारे युजर्स आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत पासवर्ड शेअर करतात. यामुळे युजर्सची प्रायव्हसी आणि डिजिटल सिक्योरिटीचा धोका वाढतो.
मार्च महिन्यात अनेक युजर्सला असे मेसेज आले आहेत की, जे आपलं स्वत:चं अकाउंट वापरत नाहीत किंवा इतरांचा पासवर्ड वापरुन नेटफ्लिक्स पाहतात, त्यांना आता ते पाहता येणार नाही. युजर्सला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे आपलं अकाउंट रजिस्टर्ड करावं लागत आहे. अकाउंटहोल्डर्सच्या फोन किंवा ईमेलवर एक कोड पाठवून व्हेरिफिकेशन प्रोसेस केली जात आहे. टू-फॅक्टर व्हेरिफिकेशनद्वारे कमीत कमी युजरला त्यांचं अकाउंट शेअर केलं जात आहे, हे माहिती होतं.
एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये आशियात जवळपास 93 लाख लोकांनी Netflix सब्सक्राईब केलं, जे 2019 च्या तुलनेत 65 टक्के अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Netflix