Home /News /technology /

राज्यात लवकरच नवी Electric Vehicle पॉलिसी; मुंबईसह या शहरांवर होणार परिणाम

राज्यात लवकरच नवी Electric Vehicle पॉलिसी; मुंबईसह या शहरांवर होणार परिणाम

राज्य सरकार पुढील एका महिन्यात नव्या इलेक्ट्रिक व्हिकल (Electric vehicle) पॉलिसीला मंजुरी देऊ शकते. महाराष्ट्रात नवी इलेक्ट्रिक पॉलिसी लागू झाल्यानंतर 5 शहरांवर याचा परिणाम होऊ शकतो.

  मुंबई, 9 जून : राज्य सरकार पुढील एका महिन्यात नव्या इलेक्ट्रिक व्हिकल (Electric vehicle) पॉलिसीला मंजुरी देऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडे याचा सुधारित मसुदा तयार आहे आणि कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर सरकार हे लागू करू शकते. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देशात इलेक्ट्रिक व्हिकलला प्रोत्साहन दिलं जात आहे. ज्याअंतर्गत राज्य सरकारही वेगवेगळ्या इलेक्ट्रिक व्हिकल पॉलिसी लागू करत आहे. महाराष्ट्र सरकारही लवकरच नव्या इलेक्ट्रिक पॉलिसीला मंजुरी देऊ शकते. या शहरांवर होणार परिणाम - महाराष्ट्रात नवी इलेक्ट्रिक पॉलिसी लागू झाल्यानंतर 5 शहरांवर याचा परिणाम होऊ शकतो. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार नवी इलेक्ट्रिक पॉलिसी मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये लागू करेल. ज्यात सर्व सरकारी विभागांना इलेक्ट्रिक व्हिकलचा वापर करावा लागू शकतो. 2022 मध्ये ही पॉलिसी केवळ 5 शहरांत लागू होईल, त्यानंतर इतर शहरांत हळू-हळू लागू केली जाईल.

  (वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

  मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिकलचे डिजी सोहिन्द्र सिंह गिल यांनी, महाराष्ट्र सरकारचा नव्या इलेक्ट्रिक व्हिकल पॉलिसीचा ड्राफ्ट अतिशय उत्तम असल्याचं सांगितलं. सरकारने ही पॉलिसी लागू केल्यास, 2025 पर्यंत आपली इलेक्ट्रिक वाहन वापरासंबंधी उद्दिष्ट्यं साध्य केली जातील, असं त्यांनी सांगितलं.

  (वाचा - लॉकडाउनमध्ये Car बंद असताना असा ठेवा मेंटेनन्स,Ford कंपनीच्या महत्त्वाच्या टिप्स)

  सर्व सेगमेंटमध्ये व्हिकल प्रोडक्शन वाढवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. 2025 पर्यंत इलेक्ट्रिक थ्री व्हिलर आणि टू व्हिलर प्रकारात 25 टक्के लक्ष्य प्राप्त करण्याचं उद्दिष्ट्यं ठेऊ शकतो.

  (वाचा - Yamaha प्रेमींसाठी खुशखबर, या दोन धमाकेदार बाईकच्या किंमतीत मोठी घसरण)

  तसंच सरकार तात्काळ मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी, कौशल्य सुविधेसाठी मर्यादित संख्येतील वाहनांसाठी काही आर्थिक प्रोत्साहन देऊन हे उद्दिष्ट्यं साध्य करू शकते, असंही त्यांनी सांगितलं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car, Electric vehicles, Tesla electric car

  पुढील बातम्या