मुंबई, 3 जून : बाईक प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. विशेषतः जे आता नवीन बाईक (New Bike) घेण्याचा किंवा जुनी बाईक अपग्रेड करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी. तुम्हाला जर यामाहाच्या (Yamaha) बाईक्स आवडत असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यामाहा कंपनीने त्यांच्या दोन बाईक्सच्या किमती 19000 हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. यामध्ये Yamaha FZ25 आणि Yamaha FZS25चा समावेश आहे.
या दोन्ही बाईक्सच्या किमती कमी करण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे टीमने बाईक्स बनवण्यासाठी लागणारा खर्च कमी केला आहे. त्यामुळे ग्राहकांनाही याचा फायदा व्हावा, या दृष्टीकोनातून किंमती कमी करण्यात आल्या आहेत. तसेच किंमती कमी केल्यामुळे या बाईक्सच्या स्पेसिफिकेशन आणि फिचरवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. किंमती कमी झाल्यानंतर Yamaha FZ25 ची एक्स शोरूम किंमत 1,34,800 रुपये झाली आहे. तर, FZS25 ची एक्स शोरूम किंमत 1,39,300 रुपये झाली. Yamaha FZ25ची आधीची एक्स शोरूम किंमत 1,53,600 होती. तर, Yamaha FZS25 ची किंमत 1,58,60 रुपये होती. Yamaha FZ25ची किंमत 18,800 रुपयांनी कमी करण्यात आली असून Yamaha FZS25 ही बाईक 19,300 रुपयांनी स्वस्त झाली आहे. कंपनीने गेल्या वर्षी दोन्ही बाईक्सचे बीएस 6 कम्प्लायंट मॉडल लॉन्च केले होते.
बाईक्सचे कलर ऑप्शन
FZ25 ही बाईक दोन रंगात तर FZS-25 ही बाईक तीन कलर ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यामाहा FZ 25 बाईक मॅटेलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्लू कलरमध्ये उपलब्ध असून FZS 25 पेटिना ग्रीन, व्हाईट-व्हर्मिलियन आणि डार्क मॅट ब्लू रंगात उपलब्ध आहे.
बाईक्सचे इंजिन आणि पावर स्पेसिफिकेशन
यामाहाने नवीन FZ25 बाईकमध्ये BS6 इंजिन अपग्रेड केलं असून बाईकच्या लूकमध्येही बदल केलाय. Yamahaच्या दोन्ही बाईक्समध्ये फ्यूअल-इंजेक्शन टेक्नॉलॉजीसह बीएस6 कम्प्लायंट 250cc, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,000rpm वर 20.8PS पावर आणि 6,000rpm वर 20.1Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकमध्ये 5 स्पीड गियरबॉक्स आहेत. FZ25 मध्ये DRLs सोबत LED हेडलाइट्स, साइड स्टॅण्ड इंजिन कट ऑफ, इंजन काऊल आणि निगेटिव्ह LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
ड्युअल चॅनल एबीएससोबत डिस्क ब्रेक
FZS25 मध्ये या सर्व फीचर्ससह विझर, लाँग वायझर, हँडल ग्रिप्सवर ब्रश गार्ड्स आणि गोल्ड अलॉय व्हिल्स देखील आहेत. बाइक्सच्या दोन्ही साईडला ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. FZS 25 बाईकचं वजन 154 किलो आहे. असं म्हटलं जातं की, भारतीय बाजारात FZ25 ची स्पर्धा Suzuki Gixxer 250 आणि Bajaj Dominar 250 सोबत राहिली आहे. या दोन्ही बाईक्सची किंमत 1.65 लाख आणि 1.60 लाख रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding