मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Fake Alert! WhatsApp वर आलेल्या या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा...

Fake Alert! WhatsApp वर आलेल्या या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा...

SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

नवी दिल्ली, 1 जून : कोरोनाच्या या कठीण काळात अनेक फेक मेसेज (Fake Message) व्हायरल होत आहेत. अशा मेसेजद्वारे अनेक लोकांची फसवणुकही होत आहे. असाच एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये केंद्र सरकार देशातील लाखो युजर्सला फ्री इंटरनेट देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु हा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा, फेक आहे. फ्री इंटरनेट देण्याचा कोणताही दावा सरकारकडून करण्यात आलेला नाही.

याबाबत सरकारी संस्था प्रेस इनफॉरमेशन ब्युरो अर्थात PIB ने ट्विटद्वारे माहिती दिली आहे. PIB ने या व्हायरल मेसेजबाबत संपूर्ण माहिती देत, हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. PIB ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, की WhatsApp मेसेजमध्ये भारत सरकार तीन महिन्यांसाठी 10 मिलियन युजर्सला मोफत इंटरनेट देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारत सरकार मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी युजर्सला 3 महिन्यांसाठी रिचार्ज फ्री देत असल्याचं व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये म्हटलं आहे. जर तुमच्याकडे Jio, Airtel किंवा VI सिम असेल, तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन फ्री रिचार्ज मिळवा, ही ऑफर लिमिटेड काळासाठी आहे, असं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. परंतु हा दावा खोटा आणि व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी लिंकही फेक आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

(वाचा - Gmail चा मेलबॉक्स भरला? नको असलेले मेल कमीत कमी वेळात कसे कराल Delete?)

(वाचा - दारू पिऊन गाडी चालवणं दूरच,आता ती स्टार्टच होणार नाही;विद्यार्थ्याने शोधला मार्ग)

अशा बनावट वेबसाईटपासून सतर्क राहण्याचंही PIB ने सांगितलं आहे. तसंच SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. फ्रॉड करणारे अशा प्रकारच्या खोट्या वेबसाईट किंवा लिंकद्वारे युजर्ससह फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात.

First published:

Tags: Cyber crime, Tech news, Whatsapp alert, Whatsapp News