जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Traffic Rule: Car Driving वेळी फोनवर बोलताना नाही लागणार दंड, पण... पाहा काय आहे नवा नियम

Traffic Rule: Car Driving वेळी फोनवर बोलताना नाही लागणार दंड, पण... पाहा काय आहे नवा नियम

Traffic Rule: Car Driving वेळी फोनवर बोलताना नाही लागणार दंड, पण... पाहा काय आहे नवा नियम

आता ट्रॅफिक नियमांनुसार जर एखादा चालक वाहन चालवताना हँड्सफ्री कम्यूनिकेशन फीचरचा (Hands free communication feature) वापर करुन फोनवर बोलत असेल, तर हा दंडनीय गुन्हा मानला जाणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

New Traffic Rule: कार चालवताना फोनवर बोलल्यास आता चालान कापणार नाही? वाचा काय आहे नवा नियमनवी दिल्ली, 19 जानेवारी : वाहन चालवताना फोनवर (Talking on phone while Driving) बोलणं गुन्हा आहे. यासाठी ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) तुमचं चालान कापू शकतात. परंतु आता ट्रॅफिक नियमांनुसार जर एखादा चालक वाहन चालवताना हँड्सफ्री कम्यूनिकेशन फीचरचा (Hands free communication feature) वापर करुन फोनवर बोलत असेल, तर हा दंडनीय गुन्हा मानला जाणार नाही. यासाठी वाहन चालकाना कोणताही दंड भरावा लागणार नाही. जर अशावेळी चालान कापलं गेलं, तर तुम्ही याला न्यायालयात आव्हान देऊ शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली आहे. लोकसभेत हिबी ईडन यांनी मोटर वाहन सुधारणा (Motor Vehicle Act) कायदा, 2019 च्या कलम 184 (c) अंतर्गत मोटार वाहनांमध्ये हँड्सफ्री कम्यूनिकेशन फीचरच्या वापरासाठी दंडाची तरतूद आहे का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की मोटार वाहन सुधारणा कायदा 2019 च्या कलम 184 (c) नुसार मोटार वाहन चालवताना हाताने धरलेल्या उपकरणाचा वापर केला असल्यास शिक्षेची तरतूद आहे. परंतु वाहन चालवताना हँड्सफ्री कम्यूनिकेशन उपकरणाचा वापर झाल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.

हे वाचा -  सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

मोटरसायकलसाठी आहेत असे नियम - दरम्यान, नव्या मोटर व्हीकल अॅक्टनुसार, चार वर्षाहून अधिक वयोगटातील व्यक्ती मोटरसायकलवर (Two Wheeler) बसल्यास तो तिसरा व्यक्ती मानला जाईल. अशात तुम्ही मोटरसायकलवर जात असताना पत्नी आणि चार वर्षाहून अधिक वय असलेला मुलगा असल्यास तुमचं चालान कापलं जाऊ शकतं. मोटर वाहन कायद्याच्या कलम 194A नुसार, तुम्ही या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपये चालान कापलं जाऊ शकतं.

हे वाचा -  सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

त्याशिवाय हेल्मेट (Helmet) न घातल्यास 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तसंच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही (Driving License) मोटर वाहन कायद्याच्या कलम 194 C अंतर्गत तीन महिन्यांसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात