मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? एका ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? एका ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या वैयक्तिकरित्या फक्त पाच लोकांनाच मेसेज फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी एका ट्रिकद्वारे एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या वैयक्तिकरित्या फक्त पाच लोकांनाच मेसेज फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी एका ट्रिकद्वारे एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या वैयक्तिकरित्या फक्त पाच लोकांनाच मेसेज फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी एका ट्रिकद्वारे एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकतो.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सध्याच्या काळात WhatsApp ही अनेक युजर्सची महत्त्वाची गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) चॅटिंगसह, फोटो शेअरिंगसह अनेक ऑफिशियल कामंही केली जातात. WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रुप तयार करावा लागतो, त्यानंतर तो मेसेज अनेक लोकांपर्यंत पोहचतो.

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या वैयक्तिकरित्या फक्त पाच लोकांनाच (Send message on WhatsApp to many People without creating any group) मेसेज फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली आहे. असं असलं तरी एका ट्रिकद्वारे एकच मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकतो.

अनेक परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो Car Insurance,विमा काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

काय आहे ट्रिक? 

सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या MORE ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर आता ज्या लोकांना ग्रुप न बनवता मेसेज पाठवायचा आहे अशा लोकांना सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर चेकमार्कच्या (WhatsApp Tricks) पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक मोठी लिस्ट तयार होईल. आता Broadcast List फीचर्सद्वारे सिलेक्ट केलेल्या लोकांना WhatsApp द्वारे मेसेज पाठवला जाईल.

FBपेपर लीकमधून मोठा खुलासा,Facebookवरुन कमी होतेय तरुणांची संख्या,काय आहेत कारणं

WhatsApp ओपन न करता पाठवा मेसेज -

व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताही लोकांना मेसेज पाठवता येतो. त्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करुन सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. ज्याला मेसेज पाठवायचा आहे अशा लोकांना सिलेक्ट करा. कॉन्टॅक्टच्या चॅटबॉक्सवर लाँग प्रेस करा. त्यानंतर समोर काही पर्याय दिसतील. त्यातून शॉटकट ऑप्शनवर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक करताच कॉन्टॅक्टचा चॅटबॉक्स होमस्क्रिनवर सेव्ह होईल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताही इतरांना मेसेज पाठवता येईल.

Noise Flair neckband : जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाला हा हेडफोन

दरम्यान, भारतात WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App असून चॅटिंगपासून ते अनेक ऑफिशियल कामांसाठी याचा वापर केला जातो. परंतु काही युजर्सला 1 नोव्हेंबरपासून आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये (WhatsApp will be discontinued in this smartphone from 1st November) सुरक्षेच्यादृष्टीने व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

First published:

Tags: WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp News