नवी दिल्ली, 22 मार्च : ऑनालाइन ट्रान्झेक्शनच्या काळात आधार कार्डचं (Aadhaar Card) महत्त्वही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आधार कार्डशिवाय कोणतंही सरकारी किंवा खासगी काम करता येत नाही. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असल्यास अनेक कामं सोपी होतात. त्यासाठी आधार कार्ड वेरिफाय (Aadhaar Card Verification) करणं आवश्यक असतं. कारण आधार कार्डच्या नावे अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. प्रत्येक 12 अंकी नंबर आधार कार्ड नंबरच असेल असं गृहित धरणं चुकीचं ठरू शकतं. 12 अंकी नंबरच्या नावे मोठी फसवणुकही होऊ (Online Fraud) शकते. त्यामुळे आधार कार्ड वेरिफाय करणं महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आधार कार्डचा सर्वच ठिकाणी वापर होत असल्याने त्याची सुरक्षितता तपासणं, वेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. वेरिफिकेशनमुळे 12 अंकी आधार नंबर खरा आहे की खोटा हे समजतं. UIDAI ने ऑनलाइन आधार कार्ड वेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे.
हे वाचा - तुमचं Facebook Account हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या 5 गोष्टी कराच
आधार कार्ड कसं कराल वेरिफाय? - सर्वात आधी UIDAI ची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. - त्यानंतर My Aadhaar मध्ये जा. My Services मध्ये ‘Verify Aadhaar Number’ वर क्लिक करा. यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा. - जो आधार नंबर वेरिफाय करायचा आहे, तो टाका. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. - आता Proceed and Verify Aadhaar वर क्लिक करा.
हे वाचा - UIDAI: Aadhaar Update साठी नवी सर्विस सुरू, तुम्हाला असा होणार फायदा
- पुढच्या पेजवर आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्याचं दिसेल. अनेकदा ट्राय करुनही आधार नंबर वेरिफाय होत नसेल तर तो आधार नंबर चालू नसल्याचं सांगितलं जाईल. अशा स्थितीत पुन्हा चालू करण्यासाठी जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये काही कागदपत्र जमा करुन आधार नंबर पुन्हा सुरू करता येईल. दरम्यान, अनेकदा आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख चुकल्यास ती बदलण्याची गरज भासते किंवा नवं आधार कार्ड बनवावं (Aadhaar Update) लागतं. अशा कामासाठी तुम्हाला आधार सेंटर (Aadhaar Centre) जाण्याची गरज नाही. आता घरबसल्या अपॉईंटमेंट घेऊ शकता आणि आधार सेवा केंद्रात लांब रांगांपासून वाचू शकता.