जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / UIDAI: Aadhaar Update साठी नवी सर्विस सुरू, तुम्हाला असा होणार फायदा

UIDAI: Aadhaar Update साठी नवी सर्विस सुरू, तुम्हाला असा होणार फायदा

UIDAI: Aadhaar Update साठी नवी सर्विस सुरू, तुम्हाला असा होणार फायदा

अनेकदा आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख चुकल्यास ती बदलण्याची गरज भासते किंवा नवं आधार कार्ड बनवावं लागतं. अशा कामासाठी तुम्हाला आधार सेंटर जाण्याची गरज नाही. आता घरबसल्या अपॉईंटमेंट घेऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मार्च : भारतात आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हे केवळ एक ओळखपत्र नसून अनेक सरकारी आणि विना सरकारी अनेक कामांसाठी अनिवार्य डॉक्युमेंट आहे. आधार कार्डमध्ये महत्त्वाची माहिती असल्याने हे यूनिक डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड असं करा अपडेट - अनेकदा आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख चुकल्यास ती बदलण्याची गरज भासते किंवा नवं आधार कार्ड बनवावं (Aadhaar Update) लागतं. अशा कामासाठी तुम्हाला आधार सेंटर (Aadhaar Centre) जाण्याची गरज नाही. आता घरबसल्या अपॉईंटमेंट घेऊ शकता आणि आधार सेवा केंद्रात लांब रांगांपासून वाचू शकता.

हे वाचा -  PAN Card Correction: घरबसल्या दुरुस्त करा पॅन कार्डमधील चूका, पाहा सोपी पद्धत

कशी घ्याल अपॉईंटमेंट -

जाहिरात

ऑनलाइन अपॉईंटमेंट शेड्युल - - https://uidai.gov.in/ वर जा. - My Aadhaar वर क्लिक करा आणि Book a appointment निवडा. - आधार सेवा केंद्रात अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी पर्याय निवडा. - ड्रॉपडाउनमध्ये तुमचं शहर आणि ठिकाण निवडा. - Proceed to book appointment वर क्लिक करा. - मोबाइल नंबर टाका. त्यानंतर New Aadhaar किंवा Aadhaar Update वर क्लिक करा. - कॅप्चा कोड टाका आणि OTP जनरेटवर क्लिक करा. - रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाका आणि वेरिफिकेशनवर क्लिक करा. - तुमचे डिटेल्स आणि पत्ता टाका. - टाइम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.

हे वाचा -  18 वर्षाखालील मुलांचंही बनवता येईल PAN Card, यासाठी लागू शकते गरज

अपॉईंटमेंटद्वारे होतील ही कामं - - नवं आधार कार्ड - नाव अपडेट - पत्ता अपडेट - मोबाइल नंबर अपडेट - ईमेल आयडी अपडेट - जन्मतारीख अपडेट - लिंग अपडेट - बायोमेट्रिक अपडेट मृत्यूनंतर आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड एक ओळख पत्र आहे. हा एक यूनिक नंबर असून व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तो तसाच राहतो. हा नंबर इतर कोणालाही दिला जाऊ शकत नाही. मृत्यूनंतर आधारचं काय होतं या संदर्भात सरकारने स्वत: संसदेत सांगितलं, की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार डिअॅक्टिवेट करता येणार नाही. अशी कोणतीही तरतूद नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात