नवी दिल्ली,15 जुलै : गुगल (Google) आधारित प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) प्रसिद्ध व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. कोट्यवधी युजर्स याचा दररोज वापर करतात. 2014 मध्ये कंपनीने यात ऑफलाईन व्हयूइंग (Offline Viewing) फीचर दिलं होतं. या फीचरचा दोन्ही अँड्रॉईड आणि iOS युजर्सही वापर करू शकतात आणि व्हिडीओ सेव्ह करुन नंतर विना इंटरनेट कनेक्शन ते पाहता येतात. हे व्हिडीओ वायफाय नेटवर्क आणि मोबाईल डेटाच्या मदतीने सेव्ह करता येतात. ऑफलाईन व्हिडीओ कसे डाउनलोड कराल? - सर्वात आधी YouTube सुरू करुन जो व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे तो सर्च करा. - सर्चनंतर समोर एक स्क्रीन येईल, जिथे तीन डॉट दिसतील. - त्यावर क्लिक करुन डाउनलोड पर्याय निवडावा लागेल. - इथे व्हिडीओ क्वालिटी विचारली जाईल. आता तो पर्याय निवडून व्हिडीओ ऑफलाईन पाहण्यासाठी डाउनलोड करू शकता. - डाउनलोड केलेले व्हिडीओ डिलीट करण्यासाठी, डाउनलोडेड व्हिडीओ पेजवर तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Delete From Downloads वर क्लिक करावं लागेल. यूट्यूब ऑफलाईन व्हिडीओ 48 तासांत हटवले जातात. हे ऑफलाईन व्हिडीओ केवळ 2 दिवसचं वैध राहतात. हॅकर्सची नजर तुमच्या Google Account वर तर नाही ना?सोप्या स्टेप्सनी ठेवा सुरक्षित इंटरनल स्टोरेजमध्ये YouTube Video डाउनलोड करण्यासाठी - यासाठी फोनमध्ये SD कार्ड असणं गरजेचं आहे. सर्वात आधी फोनवर यूट्यूब सुरू करा. - आता प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. - त्यानंतर सेटिंगवर क्लिक करा. आता व्हिडीओ स्टोरेज ऑप्शनमध्ये SD कार्डवर टॅप करा. - नंतर यूज SD कार्ड मेमरीवर क्लिक करावं लागेल. Online Fraud Alert! या लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, बसेल मोठा आर्थिक फटका YouTube वर जितके व्हिडीओ डाउनलोड केले जातात, ते सर्व डाउनलोड टॅबमध्ये जातात. डाउनलोड व्हिडीओ व्ह्यू करण्यासाठी गुगल अकाउंटमधून यूट्यूब Sign-in करावं लागेल. हे व्हिडीओ गॅलरी किंवा फाईल मॅनेजरमध्ये पाहता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.