नवी दिल्ली, 8 मार्च : तंत्रज्ञानाने जीवन अधिक सोपं, सुविधाजनक झालं आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात जगणं अधिक सुकर झालं आहे. आता कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाताना गुगल मॅप्स (Google Maps) फायद्याचं ठरतं. Google Maps मुळे प्रवास करताना रस्ता चुकण्याची चिंता नाही. पण गुगल मॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) असणं गरजेचं आहे. कधी इंटरनेट डेटा नसेल, तर मात्र गुगल मॅप्स वापरण्यासाठी समस्या येऊ शकते. नव्या शहरात किंवा अनोळखी रस्त्यावर डेटा पॅक संपला, गुगल मॅप्स काम करणं बंद झालं तर समस्या येते. परंतु एका ट्रिकने या समस्येपासून सुटका होऊ शकते. तुम्ही विना इंटरनेटही Google Maps चा वापर करू शकता.
हे वाचा - SBI Alert! या लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका, एका चुकीने बसेल मोठा फटका
विना इंटरनेट असा करा वापर - गुगल मॅपचा ऑफलाइन अर्थात विना इंटरनेटही (Google Maps Offline) वापर करता येईल. यासाठी तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन सेव्ह करून ठेवावं लागेल. त्यानंतर याचा वापर ऑफलाइनही करता येऊ शकतो. सेव्ह करुन ठेवल्याने हे ऑनलाइन प्रमाणेच काम करेल. ऑफलाइन मॅप फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये डाउनलोड होतो. ऑफलाइन मॅप फोनमध्ये केवळ 15 दिवसांपर्यंत सेव्ह करून ठेवता येतो. 15 दिवसानंतर तो पुन्हा डाउनलोड करावा लागतो. गुगल तुमचे मॅप्स ऑटोमेटिक अपडेटही करता येतं. तुम्ही सेव्ह केलेलं डेस्टिनेशन WiFi द्वारे अपडेटही होत राहतं. WiFi कनेक्टिव्हिटी न मिळाल्यास तो एक्सपायर होतो. मॅप अशाप्रकारे डाउनलोड केल्यानंतर स्लो इंटरनेट किंवा इंटरनेट कनेक्शन नसेल तरीही गुगल मॅप्सचा वापर करू शकता.
हे वाचा - तुमच्या गाडीचा Insurance लगेच करा रिन्यू, एप्रिलपासून मोठ्या बदलाची शक्यता
असा करता येईल वापर - Android फोनवर Google Maps ओपन करा. Google Maps मध्ये साइन-इन करा. ज्या ठिकाणी जायचं आहे ती जागा सर्च करा. जागेचं नाव आणि अॅड्रेस टाइप करा. त्यानंतर More ऑप्शनवर टॅप करा. इथे सर्च केलेल्या जागी मॅप ऑफलाइन डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. अशाप्रकारे लोकेशन तुम्ही 15 दिवसांपर्यंत डाउनलोड करुन ठेवू शकता.