जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Tips and Tricks: एखाद्याला ट्रॅक करायचं आहे? Google Maps असं सांगेल लोकेशन

Tips and Tricks: एखाद्याला ट्रॅक करायचं आहे? Google Maps असं सांगेल लोकेशन

Tips and Tricks: एखाद्याला ट्रॅक करायचं आहे? Google Maps असं सांगेल लोकेशन

Google Maps मुळे कोणत्याही ठिकाणी पोहोचणं सोपं ठरतं आहे. एवढंच नाही, तर याच्या मदतीने तुम्ही कोणालाही ट्रॅक करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 मार्च : सतत प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्स (Google Maps) एक आवश्यक टूल ठरतं आहे. 2005 मध्ये लाँचिंगनंतर गुगल मॅप्स आपल्या सर्विसमध्ये सतत सुधारणा करत आहे. Google Maps मुळे कोणत्याही ठिकाणी पोहोचणं सोपं ठरतं आहे. एवढंच नाही, तर याच्या मदतीने तुम्ही कोणालाही ट्रॅक करू शकता. जर तुमच्या घरातील सदस्य किंवा मित्र एखाद्या प्रवासात असेल किंवा तुमच्या इथे येत असेल तर तुम्ही त्याचं लोकेशन ट्रॅक (Google Maps Location Track) करू शकता. तुम्ही Google Maps द्वारे त्यावर लक्ष ठेवू शकता. या फीचरचे अनेक फायदे आहेत. एखाद्याला योग्य रस्ता दाखवून त्याला त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचवता येऊ शकतं. तसंच एखाद्याला रिसीव्ह करण्यासाठीही मदत होऊ शकते. तसंच घरातील एखादा सदस्य कामानिमित्त बाहेर गेला असल्यास, त्यावर गुगल मॅप्सच्या मदतीने नजर ठेवू शकता.

हे वाचा -  Smartphone हरवला किंवा चोरी झाला?या सरकारी वेबसाइटच्या मदतीने करा महत्त्वाचं काम

अँड्रॉइड डिव्हाइसवर शेअर करा तुमचं लोकेशन - तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Maps ओपन करा. आपल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. इथे Location Sharing चा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा. आता Share Location वर क्लिक करा. इथे टाइम सेट करावा लागेल की किती वेळ लाइव्ह लोकेशन दिसावं. यात डिफॉल्ट रुपात 1 तास सिलेक्ट करा. त्यानंतर कोणालाही कोणत्याही सोशल मीडियावर तुमचं लोकेशन पाठवू शकता. आणि ते कोणीही व्यक्ती ट्रॅक करू शकतो.

हे वाचा -  Instagram चा मोठा निर्णय, बंद होणार हे पॉप्युलर फीचर

कसं कराल ट्रॅक? Google Maps वरुन एखाद्याला ट्रॅक करण्यासाठी तुमच्याकडे त्याचं लाइव्ह लोकेशन असणं गरजेचं आहे. विना लोकेशन ट्रॅकिंग केलं जाऊ शकत नाही. Google Maps मध्ये लाइव्ह शेअरिंग लोकेशन फीचर मिळतं. याद्वारे कोणीही आपलं लोकेशन दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकतो. त्यानंतर लाइव्ह लोकेशनच्या मदतीने व्यक्ती तुम्हाला ट्रॅक करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात