मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Smartphone हरवला किंवा चोरी झाला? या सरकारी वेबसाइटच्या मदतीने करा महत्त्वाचं काम

Smartphone हरवला किंवा चोरी झाला? या सरकारी वेबसाइटच्या मदतीने करा महत्त्वाचं काम

मोबाईल फोन (Mobile Phone) सर्वाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. अनेक कामांसाठी मोबाईलची मदत होते. फोनमध्ये केवळ फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट नंबर्स इतकंच नसतं, तर अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सदेखील सेव्ह असतात. अशात मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता चोरी झालेला किंवा हरवलेला फोन लगेच ब्लॉक करता येऊ शकतो. तसंच फोन मिळाल्यानंतर तो अनलॉकही करता येऊ शकतो.