मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वर क्वालिटी कमी न करता असे पाठवा HD फोटो, पाहा सोपा पर्याय

WhatsApp वर क्वालिटी कमी न करता असे पाठवा HD फोटो, पाहा सोपा पर्याय

WhatsApp काही सोप्या मार्गांनी फोटो हाय-क्वालिटीमध्ये सेंड करता येतील.

WhatsApp काही सोप्या मार्गांनी फोटो हाय-क्वालिटीमध्ये सेंड करता येतील.

WhatsApp काही सोप्या मार्गांनी फोटो हाय-क्वालिटीमध्ये सेंड करता येतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : WhatsApp वर फोटो पाठवताना क्वालिटी कंप्रेस केली जाते. त्यामुळे फोटो ओरिजनल क्वालिटीमध्ये रिसिव्हरकडे पोहोचत नाही. यासाठी WhatsApp एका नव्या फीचरवर काम करत आहे. यामुळे हाय क्वालिटीमध्ये फोटो पाठवता येऊ शकतात.

पण सध्या नवं फीचर येण्यापूर्वी काही सोप्या मार्गांनी फोटो हाय-क्वालिटीमध्ये सेंड करता येतील.

WhatsApp वर परत मिळतील Delete झालेले Chats, पाहा सोपी ट्रिक

- WhatsApp वर फोटो ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवण्यासाठी फोटो Document मधून सेंड करणं सर्वात सोपा पर्याय आहे. जर एक-दोन फोटो पाठवायचे असतील, तर ही पद्धत वापरता येईल.

- यासाठी ज्याला फोटो पाठवायचा आहे, ते चॅट ओपन करा. त्यानंतर चॅटबारमध्ये क्लिपवर क्लिक करुन Document ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. यावर सिलेक्ट केल्यावर नॉन-इमेज फाइल दिसेल. त्यानंतर Browse किंवा Browse other docs च्या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

- इथे तो फोटो सिलेक्ट करा, जो ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवायचा आहे. त्यानंतर Send Icon वर क्लिक करुन फोटो ओरिजनल क्वालिटीमध्ये सेंड करता येईल.

- जर तुम्हाला अधिक फोटो ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवायचे असतील, तर तुम्ही Zip and attach file चा वापर करू शकता. तुम्ही File Commander किंवा QuickPic App डाउनलोड करुन सर्व फोटो Zip फाइल करुन Document मध्ये पाठवता येतील.

WhatsApp Users साठी Bad News; आता Chat Backup साठी येऊ शकते ही समस्या

दरम्यान, WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरद्वारे युजरला कॅशबॅकचा फायदा होईल. WhatsApp चं हे नवं फीचर Payment सर्विस WhatsApp Payment शी संबंधित आहे. हे फीचर रोलआउट झाल्यानंतर युजर्सला WhatsApp द्वारे UPI Payment केल्यानंतर कॅशबॅक मिळेल.

WABetaInfo ने या फीचरचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 'Get cashback on your next payment' आणि 'Tap to get started' अशा मेसेजसह एक Gift Icon ही बनलेला दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर भारतात UPI Payments साठी रिलीज होईल आणि कंपनी एका पेमेंटसाठी युजर्सला 10 रुपये कॅशबॅक ऑफर करेल.

First published:

Tags: Tech news, WhatsApp features, Whatsapp News, WhatsApp user