मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! हे अँड्रॉईड Apps चोरी करतात युजर्सचा Facebook पासवर्ड, लगेच करा डिलीट

सावधान! हे अँड्रॉईड Apps चोरी करतात युजर्सचा Facebook पासवर्ड, लगेच करा डिलीट

रिसर्च टीमने गुगलला धोकादायक अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे, जे गुगल प्ले स्टोरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करत आहे. आता गुगलने रिसर्च आणि वेरिफाय करुन मॅलिशिअस अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही असे Apps असल्यास ते लगेच डिलीट करा.

रिसर्च टीमने गुगलला धोकादायक अ‍ॅप्सबाबत इशारा दिला आहे, जे गुगल प्ले स्टोरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करत आहे. आता गुगलने रिसर्च आणि वेरिफाय करुन मॅलिशिअस अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही असे Apps असल्यास ते लगेच डिलीट करा.

स्मार्टफोन युजर्सला पुन्हा एकदा धोकादायक मालवेअरचा इशारा देण्यात आला आहे. 10 मॅलिशियर अ‍ॅप (Malicious App) आहेत, जे फेसबुक युजर्सचे (Facebook user) लॉगइन आणि पासवर्ड चोरी करत आहेत.

नवी दिल्ली, 4 जुलै: स्मार्टफोन युजर्सला पुन्हा एकदा धोकादायक मालवेअरचा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर वेब मालवेअर (Doctor Web Malware) अ‍ॅनालिस्टने 10 मॅलिशियर अ‍ॅप (Malicious App) शोधले आहेत, जे फेसबुक युजर्सचे (Facebook user) लॉगइन आणि पासवर्ड चोरी करत आहेत. यातील 10 पैकी 9 अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होते. सिक्योरिटी अ‍ॅनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरस असणारे अ‍ॅप्स धोकादायक सॉफ्टवेअरच्या रुपात पसरले होते. हे धोकादायक अ‍ॅप्स 5,856,010 वेळा इन्स्टॉल करण्यात आले होते. कंपनीकडून रिपोर्ट करण्यात आल्यानंतर हे 9 अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहेत.

या ट्रोजन अ‍ॅप्सने (Trojan Apps) युजर्सला जाळ्यात अडकवण्यासाठी एका स्पेशल मेकॅनिजमचा वापर केला. आवश्यक सेटिंग मिळाल्यानंतर त्यांनी वैध फेसबुक वेब पेज लोड https://www.facebook.com/login.php into WebView केलं. त्यानंतर त्यांनी जावा स्क्रिप्टचा वापर केला. या स्क्रिप्टचा वापर लॉगइन क्रेडेंशियल हायजॅक करण्यासाठी केला. त्यानंतर चोरी केलेले लॉगइन आणि पासवर्ड ट्रोजन अ‍ॅप्समध्ये पास केले आणि हे हॅकर्सच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर केले.

(वाचा - Aadhaar Cardअपडेट करणं आता आणखी सोपं;हेल्पलाईनवर करा तक्रार, सोडवली जाईल समस्या)

PIP Photo

हे एक फोटो एडिटिंग अ‍ॅप आहे, ज्याला Lilians ने डेव्हलप केलं आहे. हे अ‍ॅप 5,000,000 वेळा अँड्रॉईड डिव्हाईसवर डाउनलोड करण्यात आलं आहे.

Processing Photo 

हे फोटो एडिटिंग अ‍ॅप 5,000,000 वेळा अँड्रॉईड डिव्हाईसवर डाउनलोड करण्यात आलं आहे. chikumburahmilton ने हे डेव्हलप केलं आहे.

Rubbish Cleaner आणि Horoscope Daily हे दोन अ‍ॅप 1,000,000 वेळा इन्स्टॉल झाले आहेत.

(वाचा - Smartphone चोरी झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता; टाळण्यासाठी ही 5 कामं कराच)

Inwell Fitness

App Lock Keep

Lockit Master

Horoscope Pi

App Lock Manager

First published:

Tags: Malware, Smartphone, Tech news, Virus