• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, हॅकर्स कधीच चोरी करू शकणार नाही तुमचा डेटा

या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, हॅकर्स कधीच चोरी करू शकणार नाही तुमचा डेटा

ऑनलाईन डेटा चोरी टाळण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सायबरच्या (Maharashtra Cyber) अधिकृत ट्विटर हँडलवरुन काही गोष्टींबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : सध्या अनेक गोष्टी डिजीटली होत असल्याने अनेकांना याचा फायदा होत आहे. बँकिंग व्यवहार, पेमेंट, शॉपिंग अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन ट्रान्झेक्शन (Online Transaction) होत आहे. तर दुसरीकडे याच डिजीटल व्यवहारांचा हॅकर्सकडून (Hackers) फायदा घेतला जात आहे. हॅकर्स युजर्सचा डेटा चोरी (Data leak) करुन तो विकतात किंवा ब्लॅकमेल करुन मोठी रक्कम वसूल केली जात आहे. या डेटा चोरीमध्ये तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल आयडी, बँकिंग डिटेल्स अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्यामुळे ऑनलाईन डेटा चोरी टाळण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सायबरच्या (Maharashtra Cyber) अधिकृत ट्विटर हँडलवरुन काही गोष्टींबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यात काही स्टेप्स सांगण्यात आल्या आहेत. - मोबाईल आणि इंटरनेट वापरताना नेहमी आपला पर्सनल मोबाईल आणि लॅपटॉपचाच वापर करावा. - ऑनलाईन पद्धतीने कोणताही फॉर्म भरताना त्याची संपूर्ण माहिती घ्या. पर्सनल माहिती भरायची असल्यास, फॉर्म काटेकोरपणे तपासा. - तुमच्या पर्सनल डिव्हाईसवरुनच सोशल मीडिया अकाउंट्स लॉगइन (Social Media Account Login) करा. प्रत्येक वापरानंतर ते लॉगआउट करा. - कोणत्याही लिंक, मेल, मेसेज किंवा SMS वर माहिती घेतल्याशिवाय क्लिक करू नका.

    तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवतील या स्मार्ट Tips, वाचा Security Tricks

    - सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला Two-Factor Authentication ऑन ठेवा. नेहमी एक स्ट्राँग पासवर्ड (Strong password) ठेवा. ऑनलाईन प्रायव्हसी आणि सेफ्टी आणि फायनेंशियल स्टेटमेंट्सवर लक्ष द्या. - कोणतीही वेबसाईट ओपन करताना ती https असलेल्या URL सह ओपन करा. यामुळे तुम्ही फेक वेबसाईट आणि माहिती चोरी करणाऱ्या हॅकर्सपासून बचाव करू शकता.

    Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

    - आपल्या अकाउंट्सवर लक्ष ठेवा. काही चुकीच्या अॅक्टिव्हिटी आढळल्यास रिपोर्ट करा. तसंच पर्सनल माहिती हॅक झाल्यास, cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार करा. त्याशिवाय युजर्स कोणताही सायबर क्राईम रिपोर्ट करण्यासाठी 155260 या क्रमांकावर कॉल करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: