मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /विना इंटरनेटही वापरता येईल WhatsApp, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

विना इंटरनेटही वापरता येईल WhatsApp, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

इथे संपूर्ण डेटा .rar फाइलमध्ये कन्वर्ट होईल. याला Zip फाइलमध्येही कन्वर्ट करता येऊ शकतं.

इथे संपूर्ण डेटा .rar फाइलमध्ये कन्वर्ट होईल. याला Zip फाइलमध्येही कन्वर्ट करता येऊ शकतं.

एका ट्रिकद्वारे तुम्ही इंटरनेटविना देखील WhatsApp चा वापर करू शकता. इंटरनेटविना WhatsApp वापरण्यासाठी एक खास सिमकार्ड (Sim card) खरेदी करावं लागेल.

    नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : गेल्या वर्षापासून एकूणच संवाद साधण्याच्या, एकमेकांच्या संपर्कात (Communication) राहण्याच्या माध्यमांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर WhatsApp, टेलिग्राम (Telegram) आदी Apps चा वापर मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आदींशी कनेक्ट राहण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. यात WhatsApp ला युजर्सची विशेष पसंती मिळत आहे. कोणत्याही स्मार्टफोनवरून WhatsApp चा वापर करण्यासाठी इंटरनेटची (Internet) गरज असते, इंटरनेटविना WhatsApp वापरता येत नाही. अनेकदा डेटा पॅक संपल्यामुळे किंवा रेंज नसल्यामुळे WhatsApp सह अन्य Apps वापरण्यास अडचणी येतात. मात्र हा प्रश्न आता संपणार आहे. कारण एका ट्रिकद्वारे तुम्ही इंटरनेटविना देखील WhatsApp चा वापर करू शकता. इंटरनेटविना WhatsApp वापरण्यासाठी एक खास सिमकार्ड (Sim card) खरेदी करावं लागेल. हे सिम कार्ड वापरून तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp अगदी सहजपणे वापरू शकणार आहात.

    इंटरनेटविना WhatsApp वापरासाठी आता एक खास सिमकार्ड उपलब्ध आहे. चॅटसिम (Chat sim) असं या खास सिमकार्डचं नाव आहे. तुमच्या फोनमध्ये सिमकार्ड असलं, तरी हे सिमकार्ड अतिरिक्त खरेदी करावं लागणार आहे. नेहमीच्या सिमकार्डच्या तुलनेत चॅटसिम या विशेष सिमकार्डची किंमत जास्त असली, तरी त्याचे फायदे अनेक आहेत.

    ....तरच तुम्हाला WhatsApp Payment करता येणार; व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल

    चॅटसिम सिमकार्डची किंमत 1800 रुपये असून, त्याची वैधता एक वर्षासाठी असते. तसंच हे सिमकार्ड तुम्ही देशा-परदेशात कुठेही वापरू शकता. विशेष म्हणजे हे सिमकार्ड तुम्ही ज्या दिवशी खरेदी करता, त्यादिवसापासून एक वर्षापर्यंत याचा वापर तुम्ही करु शकता. त्यानंतर तुम्हाला हे सिमकार्ड रिचार्ज करावं लागेल. तुम्ही चॅटसिमचा वापर सुरू केल्यानंतर WhatsApp वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडणार नाही.

    Drugs And Bollywood:ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंतWhatsApp Chat

    चॅटसिम सिमकार्ड खरेदी करणं अत्यंत सोपं आहे. हे सिमकार्ड तुम्ही ऑनलाइन (Online) किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसंच हे सिमकार्ड ऑर्डरदेखील करू शकता. सिमकार्ड मिळाल्यानंतर ते स्मार्टफोनमध्ये इन्सर्ट करणंही खूप सोपं आहे. चॅटसिममुळे इंटरनेटविना WhatsApp चा वापर शक्य झाल्याने तुम्ही मित्र, कुटुंबियांसोबत अगदी सातत्यानं कनेक्ट राहू शकता.

    First published:

    Tags: Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user