नवी दिल्ली, 18 जुलै : व्हॉट्सअॅप (WhatsApp) अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स विविध मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करतात. चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र किंवा इतर कोणी तुमचं चॅट पाहत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होतो. तुमचं चॅट कोणी लपून पाहतं, की नाही हे पाहण्यासाठी एक ट्रिक आहे. याद्वारे युजर्स सहजपणे व्हॉट्सअॅप चॅटची माहिती मिळवू शकतात.
अनेकदा युजर्स आपल्या स्वत:च्या चुकीमुळेच समोरच्याला आपलं चॅट पाहण्याची संधी देतात. अशात युजर्सच्या बेजबाबदारपणामुळे व्हॉट्सअॅप हॅक होतं. एखाद्याकडून तुमच्या चॅटचा चुकीचा वापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणी तुमचं चॅट लपून पाहत तर नाही ना हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची (Third party App) आवश्यकता नाही. युजर्स त्यांच्या व्हॉट्सअॅपवरच ही माहिती मिळवू शकतात.
तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री
सर्वात आधी WhatsApp ओपन करा. आता WhatsApp Web पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही स्वत: लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअॅप ओपन केलं नसेल आणि तरीही WhatsApp Web मध्ये ते लिंक्ड (Linked) असल्याचं दिसत असेल, तर तर दुसरा व्यक्ती तुमचं व्हॉट्सअॅप चॅट पाहत असल्याची शक्यता असू शकते.
नवं फीचर!आता WhatsAppवर बिनधास्त पाठवा HD Photo,क्वॉलिटी खराब होण्याचं नो टेन्शन
तुम्ही एखाद्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअॅप लिंक केलं असेल आणि लॉगआउट करणं विसरल्यास, दुसऱ्या व्यक्तीने ही संधी साधून आपल्या लॅपटॉपमध्ये तुमचं व्हॉट्सअॅप लिंक केलेलं असू शकतं. त्यामुळे आधीपासूनच तुमचं WhatsApp Web Linked दिसत असेल, तर ते त्वरित लॉगआउट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp chats, WhatsApp user