नवी दिल्ली,16 मे : सोशल मीडिया फेसबुकचा (Facebook) सर्वाधिक वापर केला जातो. यात अनेकदा पर्सनल माहितीही असते. फेसबुकला अनेक सिक्योरिटी फीचर्सही दिले गेले आहेत. परंतु तरीही फेसबुक हॅक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. Facebook अकाउंट हॅक झाल्यास युजरच्या डेटाचा, फोटोजचा गैरवापरही होऊ शकतो. तसंच युजरच्या नावे फ्रॉडही केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सावध राहणं गरजेचं ठरतं. फेसबुक अकाउंट हॅक झाल्यास ते रिकव्हर करता येतं. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.
जर तुमच्या फेसबुक अकाउंटचा ईमेल किंवा पासवर्ड चेंज झाला असेल, तर सावध राहण्याची गरज आहे. तसंच ज्या पोस्ट किंवा मेसेज तुम्ही कधीच केले नाहीत, तरी ते तुमच्या वॉलवर, मेसेंजरमध्ये दिसत असतील तर तुमचं अकाउंट हॅक झाल्याचं समजू शकतं.
असं झाल्यास सर्वात आधी पासवर्ड बदला. यासाठी Setting and Privacy मध्ये जा. त्यानंतर Password and Security सिलेक्ट करा. त्यानंतर Change Password वर क्लिक करा. यासाठी तुम्हाला जुना पासवर्डही टाकावा लागेल.
Password and Security पेजवर असे डिव्हाइस चेक करा जिथे तुमचं अकाउंट लॉगइन आहे. त्यासाठी तुम्हाला Where You are Logged In वर क्लिक करावं लागेल. या लिस्टमध्ये कोणतंही डिव्हाइस तुमचं नसेल आणि तरीही फेसबुक लॉगइन दिसत असेल, तर ते डिव्हाइस लगेच रिमूव्ह करा.
त्यानंतर Suspicious Login वर क्लिक करा. त्यानंतर अकाउंट सिक्योर करण्यासाठी Secure Account वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फेसबुकने सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्ही फेसबुक सपोर्ट पेजवरुनही मदत घेऊ शकता. यासाठी Password and Security पेजवर Get Help वर जावं लागेल. त्यानंतर हॅक झालेलं अकाउंट रिपोर्ट करा.
जर हॅकरने तुमचं फेसबुक अकाउंट लॉगआउट केलं असेल, तर Facebook.com/hacked वर जावं लागेल. इथे फेसबुक अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर टाकावा लागेल. जर हा नंबर तुमच्या रजिस्टर्ड नंबरशी जुळत असेल तर फेसबुक अकाउंट अॅक्सेस रिगेन करण्यासाठी मदत करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Account hacked, Facebook, Hacking, Tech news