नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्ससाठी एका नवा जिओ फोन 2021 ऑफर (THE NEW JIOPHONE 2021 OFFER) घेऊन आली आहे. हा एक बंडल प्लॅन आहे. ज्यात जिओ फोन खरेदीसाठी ग्राहकांना 1999 रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच दोन वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगसह दर महिन्याला 2 जीबी डेटा यात मिळणार आहे. दुसरा प्लॅन 1499 रुपयांचा आहे. ज्यात ग्राहकांना जिओ फोनसह एक वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगसह आणि दर महिन्याला 2 जीबी डेटाही मिळेल.
749 रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा -
ऑफरमध्ये सध्या जिओ फोन असणाऱ्या ग्राहकांचाही विचार करण्यात आला आहे. एकरकमी 749 रुपये भरल्यास, वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही. अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 जीबी हाय-स्पीड डेटाही मिळेल. ही ऑफर 1 मार्चपासून संपूर्ण भारतभर लागू होणार आहे. सर्व रिलायन्स रिटेल आणि जिओ रिटेलरर्सवर या ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो.
2G मुक्त भारतासाठी मोठं पाऊल -
भारतात 2 जी ग्राहक जवळपास 30 कोटी आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अनेकदा कॉल करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. तर व्हॉईस कॉलिंगसाठी 2जी वापरणाऱ्या फीचर फोन ग्राहकांना प्रति मिनिट 1.2 ते 1.5 रुपये भरावे लागतात. तसंच कनेक्शन सुरू ठेवण्यासाठीही दर महिन्याला 50 रुपये भरावे लागतात. जिओने या ऑफरला 2G मुक्त भारतासाठी मोठं पाऊल असल्याचं सांगितलं आहे. मागील काही वर्षांपासून जिओ फोन वापरणाऱ्यांची संख्या 10 कोटीपर्यंत पोहचली आहे. जिओची नजर त्या 30 कोटी 2G ग्राहकांवर आहे, जे फीचर फोनचा वापर करतात.
या बाबत बोलताना रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितलं की, जग 5G च्या मार्गावर असताना भारतातील 30 कोटी लोक अद्यापही 2G मध्ये अडकले आहेत. ते इंटरनेटच्या वापरापासून वंचित आहेत. मागील 4 वर्षांपासून जिओने इंटरनेट सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे भारतीयांना तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे. नवीन जिओ फोन 2021 ऑफर त्या दिशेने उचलण्यात आलेलं एक पाऊल आहे.
जिओ फोनला त्याच्या स्वस्त किंमतीमुळे आणि चांगल्या बॅटरीमुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सध्या या फोनचा वापर भारतात मोठ्या संख्येत केला जात आहे. या सीरीजमध्ये कंपनीने आतापर्यंत दोन फोन लाँच केले आहेत. या सीरीजचा पहिला फोन जिओ फोन होता. त्यानंतर कंपनीने जिओ फोन 2 लाँच केला. हा फीचर फोन विक्रीमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. रिलायन्स जिओने जिओ फोनला 'इंडिया का स्मार्टफोन' या नावाने ब्रँड केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Free services, Reliance, Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news, Technology