मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

व्हायरल बातमी खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत

व्हायरल बातमी खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत

व्हिडीओजवळ शेयर, कमेंटजवळील तीन डॉटवर टॅप करून लिंक कॉपी करावी लागेल. त्यानंतर ब्राउजरमध्ये fbdown.net ओपन करा.

व्हिडीओजवळ शेयर, कमेंटजवळील तीन डॉटवर टॅप करून लिंक कॉपी करावी लागेल. त्यानंतर ब्राउजरमध्ये fbdown.net ओपन करा.

सोशल मीडियावर (Social Media) दिवसभरात अनेक फॉरवर्डेड मेसेजेस (Forwarded Messages) येत असतात. अनेकजण याची सत्यता न पडताळताच ही माहिती किंवा बातमी फॉरवर्ड करतात.

नवी दिल्ली 18 मे : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खोटे किंवा चुकीचे मेसेजेस व्हायरल होणं. आपल्यालाही इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप (WhatsApp) अशा सोशल मीडियावर (Social Media) दिवसभरात अनेक फॉरवर्डेड मेसेजेस (Forwarded Messages) येत असतात. काही जण त्याकडे लक्षही बघत नाहीत. तर, काहीजण ते मेसेजेस वाचतात आणि त्यातल्या मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करताच मेसेज पुढे पाठवून देतात. असं अनेक लोकांनी केलं, की ते मेसेजेस आपोआपच व्हायरल होतात.

काहीवेळा अशा मेसेजेमधली माहिती चुकीची असली, तरी निरुपद्रवी असते; मात्र अनेकदा कोणत्या तरी समाजाच्या भावना दुखावणारे, नोकर भरतीबद्दल चुकीची माहिती सांगणारे, फसव्या योजनांच्या जाळ्यात ओढून घेणारे किंवा अशीच काहीबाही माहिती देणारे मेसेजेसही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवत असतात. हे लक्षात घेऊन सर्व युझर्सनी आपल्याला आलेले मेसेजेस खरे असल्याची खात्री पटल्याशिवाय कोणालाही पाठवू नयेत, असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र, हे मेसेजेस खरे आहेत की नाही, हे ओळखायचं कसं?

व्हॉट्सअॅपच्या वेबसाइटवर FAQ दिलेले आहेत. त्यातून आपल्याला फेक न्यूज कशा ओळखायच्या याबद्दलच्या टिप्स मिळतात. त्याशिवाय आता भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोनेही (Press Information Bureau) फॅक्ट चेकचं (PIB Fact Check) टूल सादर केलं आहे. त्याच्या सहाय्यानं नागरिकांना आपल्याला आलेल्या मेसेजेस, बातम्या आदींची सत्यता पडताळता येते. आपल्याकडे आलेली माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेकसाठी पाठवल्यानंतर आपल्याला ती माहिती खरी आहे की खोटी याबद्दल नेमकी माहिती कळवली जाते.

त्यासाठी काय करायचं याची माहिती घेऊया -

सर्वप्रथम https://factcheck.pib.gov.in या वेबसाइटवर जावं. तिथे जाऊन भाषा निवडावी. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी द्यावा आणि कॅप्चा कोड एंटर करून सबमिट करावा.

तुम्हाला ई-मेलवर एक ओटीपी (One Time Password) येईल. तो ओटीपी वेबसाइटवर टाकून सबमिट करावा.

त्यानंतर फॅक्टचेकच्या वेबसाइटवर एक बॉक्स उघडेल. त्यात तुम्हाला तुमचं नाव, ई-मेलआयडी, तुम्ही सत्यता पडताळण्यासाठी पाठवणार असलेल्या बातमीची कॅटेगरी ही माहिती द्यावी लागेल. तसंच, तुम्ही ज्या बातमीबद्दल विचारणा करणार आहात, त्याबद्दल थोडी माहिती द्यावी लागेल. ती बातमी तिथे पेस्ट करावी लागेल .तसंच, त्यासाठी आवश्यक संदर्भ साहित्य म्हणजे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स वगैरे काही असेल तर तेही अपलोड करावं लागेल.

ही सगळी माहिती अपलोड केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करावी लागेल. सबमिट केल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोकडून त्या बातमीची/माहितीची सत्यता पडताळली जाईल. ती बातमी किंवा माहिती खरी आहे की खोटी, याचा निष्कर्ष काढला जाईल आणि तो निष्कर्ष तुम्हाला ई-मेलवर कळवला जाईल. त्यामुळे व्हायरल मेसेजद्वारे आलेल्या एखाद्या बातमीबद्दल तुम्हाला शंका असेल, तर अशाप्रकारे तिची खात्री पटवल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नका.

First published:

Tags: Fake news, Social media, Viral news