• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमचा बँक अकाउंट Password चोरी तर नाही ना झालाय? बचावासाठी लगेच करा हे काम

तुमचा बँक अकाउंट Password चोरी तर नाही ना झालाय? बचावासाठी लगेच करा हे काम

फोनमध्ये डिजीटल अकाउंट्स सोशल मीडिया, बँक अकाउंट्स, ईमेल सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड असणं गरजेचं आहे. स्ट्राँग पासवर्ड असल्यास, हॅकर्सपासून बचाव होऊ शकतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : फोनमध्ये डिजीटल अकाउंट्स सोशल मीडिया, बँक अकाउंट्स, ईमेल सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग पासवर्ड असणं गरजेचं आहे. स्ट्राँग पासवर्ड असल्यास, हॅकर्सपासून बचाव होऊ शकतो. Google ने 2019 मध्ये आफल्या युजर्सला थर्ड पार्टी लॉगइनबाबत इशारा देण्यासाठी पासवर्ड चेकअप नावाचं एक Google क्रोम एक्सटेंशन लाँच केलं होतं. त्यानंतर मागील वर्षी Google ने हे क्रोम एक्सटेंशन बंद केलं आणि ते ऑनलाइन पासवर्ड मॅनेजर आणि ब्राउजरमध्ये इंटिग्रेटेड केलं. तुमचा पासवर्ड स्ट्राँग नसेल तर Google यासाठी मदत करू शकतं. यासाठी तुम्ही passwords.google.com वर गेलात, तर तुम्ही पासवर्ड मॅनेजर रुपात लेबल केलेल्या एका पेजवर याल आणि यात तुमचा पासवर्ड चेकअप होईल.

  सुरक्षित आणि Strong Password ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, हॅकिंगपासून होईल बचाव

  Google असा तपासेल तुमचा Password - - सर्वात आधी https://passwords.google.com/checkup/start वर जाउन चेक पासवर्ड बटणावर क्लिक करा. - तुमच्या Google Account मध्ये लॉगइन करा. - आता Google तुमच्या पासवर्ड डेटाचं एक डिटेल्ड अकाउंट दाखवेल. यात माहिती मिळेल, की तुमच्या पासवर्डशी छेडछाड केली गेली आहे की नाही किंवा तुमचा पासवर्ड स्ट्राँग आहे की नाही. जर पासवर्ड स्ट्राँग नसेल, तर पासवर्ड बदलण्यासाठी माहिती दिली जाईल. - तुमचा पासवर्ड स्ट्राँग नसेल, तर Google तुमचा पासवर्ड बदलण्यासााठी, स्ट्राँग पासवर्ड ठेवण्यासाठी मदत करेल. स्ट्राँग पासवर्डची निवड करण्यासाठी काही पर्याय सुचवेल.

  Online Banking करताना Password बाबत या 8 गोष्टी लक्षात ठेवा, Fraud झाल्यास इथे करा तक्रार

  दरम्यान, ऑनलाईन अकाउंटची (Online Account) सेफ्टी अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही ऑनलाईन अकाउंटच्या सेफ्टीमध्ये पासवर्डची (Password) मोठी भूमिका असते. याबाबत Google ने काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्याद्वारे अकाउंट सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. गुगलने आपल्या टिप्समध्ये सांगितलं, की कोणत्याही युजरचा असा प्रयत्न असावा, की प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड वेगळा असेल. काही विशेष अकाउंट इंटरनेट बँकिंग सारख्या गोष्टींचे तर पासवर्ड, वेगळेच असावेत. पासवर्ड मोठा असणं गरजेचं आहे. कमीत-कमी आठ कॅरेक्टर पासवर्डमध्ये असावेत. पासवर्डमध्ये वेगवेगळ्या अक्षरांचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे. यामुळे पासवर्ड स्ट्राँग होतो. अकाउंटमध्ये मल्टी लेवल ऑथेंटिकेशन इनेबल्ड असावं. यामुळे पासवर्डची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय युजरने आपला कम्प्यूटर, सॉफ्टवेअर इतर गोष्टी अपडेटेड ठेवाव्यात.
  Published by:Karishma
  First published: