Home /News /technology /

Online Banking करताना Password बाबत या 8 गोष्टी लक्षात ठेवा, Fraud झाल्यास इथे करा तक्रार

Online Banking करताना Password बाबत या 8 गोष्टी लक्षात ठेवा, Fraud झाल्यास इथे करा तक्रार

ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, सायबर फ्रॉड अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट्स, बँकिंग अकाउंट सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली. एकीकडे डिजीटल व्यवहार वाढत असताना, दुसरीकडे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड (Banking Fraud), सायबर फ्रॉड (Cyber Fraud) अशा घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट्स, बँकिंग अकाउंट सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) नागरिकांना नेट बँकिंग (Net banking), तसंच मोबाइल बँकिंगचे पासवर्ड्स स्ट्राँग (Strong Password) ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पासवर्ड स्ट्राँग असण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या वापरल्या, तर ऑनलाइन फसवणुकीपासून (Online Fraud) बचाव होण्यासाठी मदत होऊ शकते. पासवर्ड स्ट्राँग असेल, तर पैसे आणि स्वतःची माहिती यांची सुरक्षितता वाढवली जाऊ शकते. स्ट्राँग पासवर्डसाठी काय कराल? - पासवर्डमध्ये Uppercase आणि Lowercase अशा दोन्हींचं कॉम्बिनेशन हवं. उदा aBjsE7uG - पासवर्डमध्ये आकडे आणि चिन्हं अशा दोन्हींचाही वापर करावा. उदा. AbjsE7uG61!@ - पासवर्डमध्ये कमीत कमी 8 अक्षरं असलीच पाहिजेत. - itislocked, thisismypassword अशा सहज ओळखता येण्यासारख्या पासवर्ड्सचा वापर करू नये. - ‘qwerty’ किंवा ‘asdfg’ अशा कीबोर्ड पाथचा वापर पासवर्डसाठी करता कामा नये. “:)”, “:/’आदींचा वापर करू शकता. - 12345678 किंवा abcdefg असे अगदी कॉमन पासवर्ड्स ठेवू नयेत. - सहज अंदाज बांधता येऊ शकतो, अशा सबस्टिट्यूशनचा वापर करू नये. उदाहरणार्थ - DOORBELL-DOOR8377 - पासवर्डमध्ये आपलं नाव आणि जन्मतारीख असू नये. उदाहरणार्थ Ramesh@1967

SMS,मेल,सोशल मीडिया..कसाही होऊ शकतो Online Fraud,बचावासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

हेल्पलाइन - ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास, 155260 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुमची तक्रार दाखल करता येईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) लाँच केलं आहे. https://cybercrime.gov.in/ या तक्रार दाखल करता येते. दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातले नागरिक या हेल्पलाइन क्रमांकावर आठवड्याच्या सातही दिवशी कोणत्याही वेळी कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. अन्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खुला असतो. त्या वेळेत तक्रार नोंदवता येऊ शकते. त्याशिवाय सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम हा प्लॅटफॉर्मही नागरिकांना उपयुक्त ठरतो. सुमारे 55 बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवेज आणि इतर कंपन्यांनी एकत्र येऊन त्याची निर्मिती केली आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना मदत मिळते.
Published by:Karishma
First published:

Tags: Cyber crime, Online crime, Online fraud, Online payments, Tech news

पुढील बातम्या