Home /News /technology /

PVC Aadhaar मागवणं आता आणखी सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं Card; पाहा प्रोसेस

PVC Aadhaar मागवणं आता आणखी सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं Card; पाहा प्रोसेस

एका मोबाइल नंबरवरुन तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी PVC Aadhaar Card ऑर्डर करू शकता. सहजपणे संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींचं PVC आधार कार्ड ऑनलाइन मागवता येईल.

  नवी दिल्ली, 27 जानेवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. खासगी-सरकारी कोणत्याही कामासाठी आधार क्रमांक मागितला जातो. ओळखपत्र, अॅड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे अनेकजण प्रत्येकवेळी आधार कार्ड सोबत बाळगतात. आधार कार्ड सोबत असलं, तरी ते हरवण्याचीही भीती असते. त्यामुळे अशावेळी (PVC Aadhaar Card) वापरणं फायद्याचं ठरतं. पोलिविनाइल क्लोराइड (PVC) कार्ड ATM किंवा Credit Card प्रमाणे दिसतं. त्यामुळे हे सहजपणे आपल्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवणं सोपं आणि सोयीचं ठरतं. घरबसल्या आपल्या मोबाइलच्या मदतीने PVC Aadhaar Card मागवता येतं. UIDAI ने याबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. आता एका मोबाइल नंबरवरुन तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी PVC Aadhaar Card ऑर्डर करू शकता. सहजपणे संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींचं PVC आधार कार्ड ऑनलाइन मागवता येईल. PVC Aadhaar Card ऑर्डर करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागतील. यात स्पीड पोस्टचा खर्चही जोडलेला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) PVC कार्ड जारी करत असून हे कार्ड मागवण्यासाठीची पद्धतही सोपी आहे.

  हे वाचा - Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ची माहिती

  -सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ओपन करा. -त्यानंतर My Aadhaar Section मध्ये Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा. -Order Aadhaar PVC Card वर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी वर्चुअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकावा लागेल. या तीनपैकी कोणताही एक नंबर टाकू शकता. -आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा. -रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. -आता PVC Card Preview कॉपी येईल. इथे आधारचे डिटेल्सही दिसतील. -जर तुमचा मोबाइल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड नसेल, तर Request OTP समोर असलेल्या एका ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर मोबाइल नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा. -OTP आल्यानंतर शेवटी पेमेंट ऑप्शन येईल. इथे 50 रुपये भरावे लागतील. त्यानंतर आधार PVC ऑर्डर होईल आणि 15 दिवसात स्पीड पोस्टद्वारे आधार कार्ड घरी येईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, M aadhar card, Tech news

  पुढील बातम्या