मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडची फोन गॅलरी चेक करायची पण तुमच्याकडे पासवर्ड नाही? वापरा 'ही' Trick

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडची फोन गॅलरी चेक करायची पण तुमच्याकडे पासवर्ड नाही? वापरा 'ही' Trick

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

सोशल मीडियावर अशा काही ट्रक व्हायरल होत आहेत, ज्याचा वापर करुन तुम्ही विना पासवर्ड फोनची गॅलरी ओपन करु शकता. हे कसं शक्य आहे? जाणून घ्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 13 सप्टेंबर : सध्याच्या काळात फोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट बनली आहे. कोणतीही गोष्ट किंवा काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला लागतो, तो आपला मोबाईल. त्यात समजा जर कधी मोबाईल खराब झाला, तर आपलं सगळच आयुष्यच थांबून राहातं, मग विचार करा की फोनला लोकांच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे.

अगदी फोनवरुन पैसे पाठवण्यापासून ते बँकेशी संबंधीत अनेक व्यवहार आपण करतो, इतकेच नाही तर फोनमध्ये आपण आपल्या अनेक पर्सनल गोष्टी जपून ठेवतो. ज्यामुळे फोन आपल्या खूपच जवळचा विषय आहे. ज्यामुळे ते फोनला तसेच फोनमधील ऍपला लॉक लावतात.

परंतू जर आपल्याला फोनच्य गॅलरीमधील फोटो पाहायचे असतील आणि कोणत्याही कारणामुळे त्याच्या गॅलरीचा लॉक असेल, तर मात्र फारच अडचण निर्माण होते. ज्यामुळे बरीच काम थांबतात. तर अशावेळी काय करावं हे लोकांना कळत नाही. तर अशा लोकांसाठी आम्ही काही ट्रिक घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही विना पासवर्ड गॅलरी ओपन करु शकता.

परंतू तुम्ही या ट्रिकचा वापर कोणत्या ही चूकीच्या कामासाठी करु नका. चला जाणून घेऊ

हे वाचा : अँड्रॉइड फोन लवकर चार्ज होत नाहीये? काळजी करु नका 'या' स्टेप्स फॉलो करा, फायदा तुमचाच

अशा प्रकारे विना पासवर्ड ओपन करा गॅलरी

स्टेप 1

सध्या लोक सिक्योरिटीच्या दृष्टीकोनातून आणि आपली प्रायवसी राखायची म्हणून अशा काही ऍपचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची फोटो गॅलरी लॉक राहाते आणि ती इतरांना ती ओपन करता येत नाही. तुम्हाला जर अशी गॅलरी ओपन करायची असेल तर, तुम्हाला प्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ऍपच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2

येथे Apps वर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या अॅप्सची संपूर्ण यादी मिळेल. येथे तुम्हाला अॅप लॉकवाल्या अॅपला शोधायचं आहे. येथे तुम्हाला अॅपलॉक नावाचं ऍप किंवा सीएम सिक्युरिटी असं कोणतंही ऍप सापडेल, तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे.

स्टेप 3

यानंतर, तुमच्या समोर एक विंडो येईल, ज्यावर तुम्हाला अनइंस्टॉल ऍपचा र्याय दिसेल. त्यावर तुम्हाला फोर्स स्टॉपचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.

हे वाचा : Phone Hack: फोन बंद असला तरी होणार रेकॉर्डिंग, वापरा ही ट्रिक

स्टेप 4

तुम्ही Force Stop वर क्लिक करताच तुमच्या समोर एक मेसेज येईल, त्याच्या OK वर क्लिक करा. त्यानंतर ते ऍप पासवर्डशिवाय ओपन होईल.

मात्र, हे लक्षात घ्या की ज्या व्यक्तीटचा हा फोन आहे, त्याच्या परवानगीशिवाय त्याचा मोबाईल आणि त्याची गॅलरी उघडणे योग्य नाही. कायद्याने हे चूकीचं देखील आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच कोणाला ही त्रास देण्यासाठी असं करु नका. गरज असेल किंवा तसंच काहीसं महत्वाचं काम असेल, तर आणि तरच तुम्ही याचा वापर करा.

First published:

Tags: Tech news, Technology, Tips