मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Phone Hack: फोन बंद असला तरी होणार रेकॉर्डिंग, वापरा ही ट्रिक

Phone Hack: फोन बंद असला तरी होणार रेकॉर्डिंग, वापरा ही ट्रिक

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे apps आहेत का जे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात? कुणालाही कळू न देता गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल तर असे अॅप प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे apps आहेत का जे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात? कुणालाही कळू न देता गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल तर असे अॅप प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे apps आहेत का जे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात? कुणालाही कळू न देता गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल तर असे अॅप प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : कधीकधी असं काहीतरी घडतं की आपल्याला वाटतं अरे आपण हे रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं. फोनमधील रेकॉर्डचा वापर केला तर तो कळतो. पण मोबाईल बंद असतानाही छुप्या पद्धतीनं तुम्ही कॉल अगदी सहज रेकॉर्ड करू शकता. फक्त कॉलच नाही तर एखादी महत्त्वाची गोष्टही तुम्ही रेकॉर्ड करू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला ट्रिक सांगणार आहोत.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असे अॅप्स आहेत का जे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात? कुणालाही कळू न देता गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल तर असे अॅप प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे. असा एक स्पाय कॅमेरा अॅपबद्दल सांगणार आहोत, जे समोरच्या व्यक्तीला वाटेल की तुमचा मोबाइल बंद आहे पण तुमचे रेकॉर्डिंग करत राहील.

हजारो लोकांनी या अॅपचा वापर केला आहे. अनेकांनी याला स्पाय अॅप म्हणून देखील चांगले रेटिंग्स दिले आहेत. हे App मोबाईलच्या बॅकग्राउंडवर काम करतं. तुम्ही जर तुमचा डिस्प्ले बंद केला असेल तरीही तुम्ही अगदी सहज रेकॉर्डिंग करू शकता हेच याचं वैशिष्ट्यं आहे. मात्र या गोष्टीची काळजी घ्या की कोणाचंही लपून छपून व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे असे App वापरणं धोकादायक देखील ठरू शकतं. कोणत्याही गैरमार्गासाठी हे App वापरल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Super Screen Recorder–REC Video Record, Screenshot या नावाने हे App प्रसिद्ध आहे. युजर्सनी त्याला 4.5 रेटिंग्स दिले आहेत. स्क्रीन बंद असूनही या अॅपमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड होतो. जो या अॅपचा प्लस पॉईंट आहे. मात्र अशा अॅपमधून तुमच्या फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोकाही तेवढाच असतो. त्यामुळे हे अॅप स्वत:च्या रिस्कवर डाऊनलोड करावं.

या व्यतिरिक्त, एक अॅप बॅकग्राउंड व्हिडीओ रेकॉर्डर (BVR) आहे. जो सहसा बॅकग्राउंड कॅमेरा प्रिव्ह्यूमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास मदत करतो. स्क्रीन बंद असताना किंवा रेकॉर्डिंगसाठी शेड्यूल केलेले असताना रेकॉर्डिंग सुरू ठेवणे शक्य होतं. एका क्लिकवर व्हिडीओ आणि ऑडिओ दोन्ही रेकॉर्ड होऊ शकतात.

सर्वात महत्त्वाचं असे अॅप वापरताना कोणताही गैरप्रकार करत असाल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कोणाच्याही परवानगीशिवाय त्याचे व्हिडीओ काढणं हा देखील गुन्हा आहे. या App द्वारे मोबाईलमध्ये व्हायरस येण्याचा धोका असतो. त्यामुळे असे App डाऊनलोड करताना व्हायरस येणार नाही याची काळजी घ्या.

First published:

Tags: Digital prime time