मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अँड्रॉइड फोन लवकर चार्ज होत नाहीये? काळजी करु नका 'या' स्टेप्स फॉलो करा, फायदा तुमचाच

अँड्रॉइड फोन लवकर चार्ज होत नाहीये? काळजी करु नका 'या' स्टेप्स फॉलो करा, फायदा तुमचाच

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

अँड्रॉइड फोनचं स्क्रीन ब्लॅक होणं, चार्जिंग केल्यानंतरही स्क्रीन ऑन न होणं अशा समस्या युझर्सना येतात. अशावेळी काय करावं? यावर गुगलने काही ट्रिक्स सांगितल्या आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 7 सप्टेंबर : बहुतांश गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यामुळे साहजिकच स्मार्टफोन (Smartphone) ही अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्टफोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याचदा अँड्रॉइड (Android) आणि टॅबलेट (Tablet) युझर्सना हॅंडसेट खराब होणं, व्यवस्थित चार्जिंग न होणं, फॉल्स चार्जिंग यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. ज्यामुळे स्मार्टफोन पूर्ण आणि नीट चार्जिंग होत नाही, अशी तक्रारही काही युझर्स करताना दिसतात. अँड्रॉइड फोनमध्ये अशा समस्या अनेकदा निर्माण होतात. या समस्या दूर करण्याकरिता गुगलने काही स्टेप्स सांगितल्या आहेत. या स्टेप्सचा वापर करून युझर्स डिव्हाइस चार्जिंगविषयीच्या (Device Charging) समस्या दूर करू शकतात.

अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅबलेट युझर्सना डिव्हाइस चार्जिंगबद्दल अनेक समस्यांचा बऱ्याचदा सामना करावा लागतो. अँड्रॉइड फोनचं स्क्रीन ब्लॅक होणं, चार्जिंग केल्यानंतरही स्क्रीन ऑन न होणं अशा समस्या युझर्सना येतात.

गुगलने (Google) या समस्या दूर करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत. बऱ्याचदा अँड्रॉइड डिव्हाइस स्विच ऑन (Switch On) केल्यानंतर पटकन ब्लॅक होतं. डिव्हाइस चार्जिंगला लावल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. अशा वेळी युझर्सनी आपल्या मोबाइलचं पॉवर बटण (Power Button) पाच ते सात सेकंदापर्यंत दाबून ठेवावं. यामुळे डिव्हाइस रिस्टार्ट होऊ शकतं. त्यामुळे फॉल्स चार्जिंगची समस्या दूर होऊ शकते.

प्रयत्न करूनही कोणत्याही प्रकारे अँड्रॉइड डिव्हाइस चार्ज होत नसेल तर तुम्ही डिस्प्ले मॅन्युअली रिपेअर करू शकता. यासाठी युझर्सनी 30 सेकंद पॉवर बटण प्रेस करावं आणि त्यानंतर दोन मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी. त्यानंतर युझर्सनी आपल्या डिव्हाइसवर रिंग (Ring) देण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी युझर्स दुसऱ्या डिव्हाइसचा वापर करू शकतात किंवा 'फाइंड माय डिव्हाइस' या फीचरचा वापर करू शकतात. डिव्हाइसवर रिंग आली, तर युझर्स स्क्रीनच्या अ‍ॅडव्हान्स डिस्प्ले सेंटिंगमध्ये जाऊन त्यात बदल करू शकतात; पण या स्टेप्स काहीशा अवघड आणि संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे यासाठी एक्स्पर्टची मदत घेणं फायदेशीर ठरेल.

हे वाचा : YouTube वरील जाहिरातींना कंटाळला आहात? मग ही Trick वापरा Ads Free व्हिडीओ पाहा

काही वेळा अँड्रॉइड डिव्हाइसला चार्जर (Charger) कनेक्ट केल्यानंतरही डिव्हाइस चालू होत नाही. जेव्हा डिव्हाइसची बॅटरी पूर्णतः संपलेली असते, तेव्हा असं होतं. जेव्हा डिव्हाइस बंद होतं, पण चार्जिंग सुरू असताना स्क्रीनवर बॅटरी आयकॉन (Battery Icon) दिसतो, तेव्हा बॅटरी पूर्णपणे संपलेली नसते. अशा वेळी तातडीने डिव्हाइस रिस्टार्ट करावं. परंतु युझर्सना लाल लाइट दिसत असेल तर त्याचा अर्थ डिव्हाइसमधली बॅटरी पूर्णपणे संपलेली असते.

गुगलच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला लाल लाइट (Red Light) दिसत असेल तर त्याचा अर्थ डिव्हाइस पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची क्षमता बॅटरीत नाही, असा होतो. त्यामुळे युझर्सना डिव्हाइस रिस्टार्ट करण्यापूर्वी, ते किमान 30 मिनिटं चार्ज करणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला लाल लाइट नाही, पण एक बॅटरी आयकॉन दिसत असेल, तर तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनमध्ये दोष असू शकतो. काही कंपन्यांच्या डिव्हाइसमध्ये बॅटरीची कमतरता आणि लाइट या गोष्टी भिन्न असू शकतात, असंही गुगलनं म्हटलं आहे.

अँड्रॉइड डिव्हाइस व्यवस्थित चार्ज होत नसेल, तर युझर्सनी चार्जिंग केबल आणि डिव्हाइसची चार्जिंग पोर्ट (Charging Port) बाहेरील बाजूने तपासून पाहिली पाहिजे. यासाठी युझर्स केबल इतर कोणत्याही डिव्हाइसला कनेक्ट करून तपासू शकतात. तसंच केबल चार्जर आणि डिव्हाइस एकमेकांना नीट कनेक्ट झाले आहेत की नाही, हे तपासनं देखील गरजेचं आहे.

हे वाचा : Google Calendar: तुम्हीही मीटिंगची वेळ अन् तारीख विसरता? मग गूगल कॅलेंडरची घ्या मदत

युझर्सनी डिव्हाइसच्या चार्जिंग पोर्टमध्ये धूळ किंवा घाण साचलेली नाही ना हे देखील पाहिलं पाहिजे. गुगलने युझर्सना केस, कव्हर किंवा बॅटरी पॅकसारखी कोणतीही अ‍ॅक्सेसरीज डिव्हाइसच्या सेन्सर्सना झाकत नाही ना किंवा साइड पॅनेलवरच्या बटणावर कोणताही परिणाम होत नाही ना, हे तपासून पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर इतर कोणतंही डिव्हाइस कनेक्ट केलं असता पॉवर आउटलेट योग्यरीत्या काम करत आहे की नाही, हेदेखील युझर्सनी तपासलं पाहिजे, असा सल्ला गुगलने दिला आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone, Tech news