नवी दिल्ली, 11 जानेवारी : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) असणं गरजेचं आहे. लायसन्सची वैधता संपली असेल तर रिन्यू (Renew) करणे गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्याही अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर ते रिन्यू (Renew) करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत लायसन्स रिन्यू न केल्यास दंड भरावा लागू शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स असं करा रिन्यू -
- सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाईटवर जा
- त्यानंतर Driving License Related Services हा पर्याय निवडा.
- Apply Online बटणावर क्लिक करून त्यातील New Learners Licence पर्याय निवडा.
- त्यांनतर दिलेल्या रकान्यांमध्ये विचारलेली माहिती भरा
- त्या ठिकाणी हवी असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- नंतर जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन स्लॉट बुक करण्यासाठी पैसे भरावे लागतील
- यानंतर बायोमेट्रिक करून कागदपत्र तपासली जातील
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लायसन्स रिन्यू होईल. याच पद्धतीने आरसी बुक देखील रिन्यू करू शकता
लायसन्स रिन्यू करण्यासाठी कागदपत्रं -
- यासाठी फॉर्म डी डाऊनलोड करावा लागेल
- त्यानंतर स्कॅन करून तो अपलोड करावा
- वयवर्ष 40 हून अधिक असेल, तर अधिकृत डॉक्टरकडून घेतलेला फॉर्म 1ए लागेल
- यानंतर आधार कार्ड फोटो, पासपोर्ट साईज फोटो तसंच वैधता संपलेलं ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करावा लागेल
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) काढण्यासाठी सर्वात आधी लर्निंग लायसन्स (Learning License) काढणं गरजेचं आहे. याची मुदत भारतीय मोटार व्हेईकल ऍक्ट 1988 नुसार सहा महिन्याची असते. यानंतर कायमस्वरुपी लायसन्स मिळू शकतं.
यासाठी अर्ज करताना आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (Pancard) किंवा रहिवासी पत्ता असलेला अधिकृत पुरावा द्यावा लागतो. यानंतर 30 दिवसांच्या आत पोस्टाने लायसन्स घरी येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: While driving