Home /News /technology /

इंटरनेट नसेल तरीही मोबाइलवरून करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

इंटरनेट नसेल तरीही मोबाइलवरून करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी प्रोसेस

RBI चे गवर्नर शक्तिकांता दास यांनी मंगळवारी फीचर फोन अर्थात स्मार्टफोन नसलेल्या फोनसाठी UPI 123Pay नावाची एक नवी डिजीटल पेमेंट सर्विस लाँच केली आहे.

  नवी दिल्ली, 10 मार्च : यूनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI भारतात दररोजच्या व्यवहारांसाठी अगदी सर्रास वापरलं जातं. कॅश पेमेंटनंतर यूपीआय पेमेंट (UPI Payment) सर्वात पॉप्युलर पेमेंट मोडपैकी एक आहे. कोरोना काळात तर UPI Payment मध्ये मोठी वाढ झाली आहे. आता ही सुविधा अधिकच सोपी आणि सुविधाजनक करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाची घोषणा केली आहे. RBI चे गवर्नर शक्तिकांता दास यांनी मंगळवारी फीचर फोन अर्थात स्मार्टफोन नसलेल्या फोनसाठी UPI 123Pay नावाची एक नवी डिजीटल पेमेंट सर्विस लाँच केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI च्या मदतीने नवी UPI सर्विस सुरू केली असून ही विना इंटरनेट काम करेल. अद्यापही अनेक जण फीचर फोनचा वापर करतात. अशात ग्रामीण भागातील लोकांनाही यूपीआय सेवांचा वापर करता यावा यासाठी UPI 123Pay सुविधा लाँच करण्यात आली. फीचर फोनमध्ये UPI 123Pay सर्विसद्वारे पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन किंवा इंटरनेट कनेक्शनची गरज नाही. फीचर फोन अर्थात (Feature Phone) स्मार्टफोन नसलेल्या फोनमध्ये UPI चा वापर करण्यासाठी ग्राहकांना केवळ आपल्या डेबिट कार्ड डिटेल्ससह आपलं बँक अकाउंट फीचर फोनला जोडावं लागेल. फीचर फोन युजर्स चार वेगवेगळ्या पद्धतींनी पेमेंट करू शकतात. मिस्ड कॉल, App आधारित, इंटरअॅक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स (IVR) किंवा साउंड बेस्ड पेमेंट करता येईल. फीचर फोनमध्ये UPI 123Pay द्वारे युजर बिल भरू शकतो. त्याशिवाय फास्टॅग रिचार्ज, मोबाइल बिलही भरू शकतो. तसंच युजर अकाउंट बॅलेन्सही तपासू शकतो.

  हे वाचा - विना Internet ही वापरता येईल Google Maps, पाहा सोपी ट्रिक

  विना इंटरनेट UPI 123Pay चा कसा कराल वापर? - सर्वात आधी बँक अकाउंट UPI 123Pay शी लिंक करा. - लिंक झाल्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन UPI PIN सेट करा. - PIN सेट केल्यानंतर तुमच्या फीचर फोनचा वापर करावा लागेल आणि IVR नंबरवर कॉल करावा लागेल. त्यानंतर मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट असा कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा. - जर तुम्हाहा पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तो पर्याय निवडा आणि रिसिव्हरचा फोन नंबर Add करा. रक्कम टाका आणि पिन नंबर टाका. पेमेंट करण्यासाठी वर दिल्यापैकी कोणताही पेमेंट मोड निवडू शकता. यात व्हॉइस कमांडही देण्यात आली आहे.

  हे वाचा - Aadhaar Card Update: रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय डाउनलोड करा आधार कार्ड, पाहा सोपी प्रोसेस

  24 तास मिळेल सेवा - RBI गवर्नर शक्तिकांत दास यांनी डिजीटल पेमेंटसाठी एक हेल्पलाइन 'डिजीसाथी' देखील लाँच केलं आहे. 'डिजीसाथी' वेबसाइट आणि चॅटबॉटद्वारे कॉल करणाऱ्या युजर्सला मदत करेल. युजर मदतीसाठी www.digisaathi.info वर क्लिक करू शकतात. किंवा डिजीटल पेमेंट आणि तक्रारीसाठी आपल्या फोनवरुन 14431 आणि 1800 891 3333 वर कॉल करू शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Online payments, Tech news, Upi

  पुढील बातम्या