नवी दिल्ली, 10 मार्च : आधार कार्ड (Aadhaar Card) डाउनलोड करण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरची (Registered Mobile Number) गरज असते. परंतु आता तुम्ही आधार कार्ड विना रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवायही डाउनलोड करू शकता. आधार कार्ड जारी करणाऱ्या यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) याबाबत घोषणा केली आहे.
हे वाचा - आता रुग्णालयातही बनणार Aadhaar Card, मराठी भाषेत देखील असणार आधार कार्डवर माहिती
ज्या लोकांनी आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड केला नाही त्यांच्यासाठी UIDAI ने हे पाऊल उचललं आहे. याआधी युजर्सला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधारशी जोडलेल्या रजिस्टर्ड मोबाइल (Mobile Number Link To Aadhaar Card) नंबरची गरज होती. परंतु आता नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करता येईल.
हे वाचा - तुमचा मोबाइल नंबर Jio मध्ये Port करायचा आहे?केवळ 6 स्टेप्समध्ये करा सोपी प्रोसेस
आधार कार्ड डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया - - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. आता My Aadhaar वर क्लिक करा. - आता Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा. - इथे 12 अंकी आधार नंबर टाका. - आधार नंबरऐवजी 16 अंकी वर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबरही टाकू शकता. - त्यानंतर कॅप्चा कोड टाका. - रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करायचं असल्यास My Mobile Number is not Registerd पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर पर्यायी नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा. - तुम्ही टाकलेल्या पर्यायी नंबरवर OTP येईल. त्यानंतर अटी आणि नियम असलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि Submit करा. - आता एका नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. रिप्रिंटिंग वेरिफिकेशनसाठी प्रिव्यू आधार लेटरचा पर्याय मिळेल. - त्यानंतर Make Payment पर्याय निवडा. मृत्यूनंतर Aadhaar Card चं काय होतं? आधार कार्ड एक ओळख पत्र आहे. हा एक यूनिक नंबर असून व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तो तसाच राहतो. हा नंबर इतर कोणालाही दिला जाऊ शकत नाही. मृत्यूनंतर आधारचं काय होतं या संदर्भात सरकारने स्वत: संसदेत सांगितलं, की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार डिअॅक्टिवेट करता येणार नाही. अशी कोणतीही तरतूद नाही. मृत व्यक्तीचं आधार कार्ड डिअॅक्टिवेट करण्यासाठी सध्या कोणतंही सिस्टम नाही. परंतु एकदा या प्रोसेसचं फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर रजिस्ट्रार मृत व्यक्तीचं आधार निष्क्रिय करण्यासाठी UIDAI सह सुरू केलं जाईल. आधार कार्ड डेथ सर्टिफिकेटशी लिंक केल्यानंतर याचा चुकीचा उपयोग केला जाऊ शकत नाही.