नवी दिल्ली, 10 मार्च : बँक, सरकारी योजनांसह जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) गरजेचं ठरतं. आधारच्या वाढत्या वापरासह यासंबंधीचे धोकेही वाढत आहेत. आधार कार्ड हरवल्याने, चोरी झाल्याने किंवा डेटा लीक झाल्याने धोका वाढतो. फ्रॉडस्टर्सच्या हाती आधार कार्ड डिटेल्स लागल्यास बँक खात्यातून पैसे चोरी होण्याचा धोकाही वाढतो. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची (Aadhaar Card Lock) सुविधा दिली आहे. घरबसल्या याचा वापर करुन फ्रॉडपासून बचाव करता येतो. आधार कार्ड लॉक करण्यासाठी 16 अंकी व्हर्चुअल आयडीची (Virtual ID) गरज असते. जर तुमच्याकडे 16 अंकी वर्चुअल आयडी नसल्यास तुम्ही 1947 वर SMS पाठवून तो मिळवता येतो. एकदा वर्चुअल आयडी मिळाल्यानंतर तुमच्या फोनवरुन आधार लॉक करता येऊ शकतं. कसं Lock कराल Aadhaar Card - आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि OTP लिहून पाठवावा लागेल. अशाप्रकारे तुमचं आधार कार्ड लॉक होईल. आधार नंबर लॉक केल्यानंतर हे हरवलं तरीही कोणी चुकीचा वापर करू शकणार नाही.
हे वाचा - Aadhaar Update : रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवाय डाउनलोड करा आधार कार्ड, पाहा प्रोसेस
Aadhaar Card Unlock कसं कराल - लॉक आधार कार्ड पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुमच्या मोबाइल नंबरवरुन 1947 या नंबरवर GETOTP असा मेसेज पाठवा. मेसेज पाठवल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल. तुम्हाला ‘UNLOCKUID आधार नंबर’, वर्चुअल आयडीचे शेवटची 6 अंक आणि OTP लिहून 1947 वर मेसेज पाठवावा लागेल. आता तुमचं आधार कार्ड अनलॉक होईल.
हे वाचा - Tata च्या शेअरची कमाल, दोन वर्षात 1000% रिटर्न; तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?
मृत्यूनंतर Aadhaar Card चं काय होतं? आधार कार्ड एक ओळख पत्र आहे. हा एक यूनिक नंबर असून व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तो तसाच राहतो. हा नंबर इतर कोणालाही दिला जाऊ शकत नाही. मृत्यूनंतर आधारचं काय होतं या संदर्भात सरकारने स्वत: संसदेत सांगितलं, की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार डिअॅक्टिवेट करता येणार नाही. अशी कोणतीही तरतूद नाही. मृत व्यक्तीचं आधार कार्ड डिअॅक्टिवेट करण्यासाठी सध्या कोणतंही सिस्टम नाही. परंतु एकदा या प्रोसेसचं फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर रजिस्ट्रार मृत व्यक्तीचं आधार निष्क्रिय करण्यासाठी UIDAI सह सुरू केलं जाईल. आधार कार्ड डेथ सर्टिफिकेटशी लिंक केल्यानंतर याचा चुकीचा उपयोग केला जाऊ शकत नाही.