• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमचं Driving License आधारशी लिंक केलं का? लगेच करा हे काम, अन्यथा बसेल मोठा फटका

तुमचं Driving License आधारशी लिंक केलं का? लगेच करा हे काम, अन्यथा बसेल मोठा फटका

गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्सही आपल्या आधार कार्डशी जोडण्याचा आदेश दिला आहे. जर तुम्ही अजूनही ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक केलं नसेल, तर घरबसल्या सोप्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करता येऊ शकतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जुलै : आधार कार्ड सर्वच सरकारी आणि खासगी कामांसाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड द्यावं लागतं किंवा लिंक करावं लागतं. पॅन कार्ड, बँकांप्रमाणे सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सही (Driving License) आधार कार्डशी लिंक करण्याचं सांगितलं आहे. यामुळे चालकांना सरकारच्या कॉन्टॅक्टलेस सर्विसेजचा लाभ मिळेल. त्याशिवाय आधार कार्डशी ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करणं अनेक दृष्टीने फायद्याचं ठरतं. देशात बनावट ड्रायव्हिंग लायसन्स वापरून गाडी चालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. तसंच बनावट लायसन्स देऊन अनेकदा फसवणूक केल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. असे गैरप्रकार टाळण्यासाठी सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्सही आपल्या आधार कार्डशी (Aadhaar card) जोडण्याचा आदेश दिला आहे. लायसन्स आधार कार्डसोबत लिंक केल्यास बनावट लायसन्स (fake License) बद्दल माहिती मिळवणं सोपं होईल. तसंच तुम्हाला दिलेल्या तुमच्या लायसन्स बद्दलचीही योग्य माहिती मिळेल. जर तुम्ही अजूनही ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक केलं नसेल, तर घरबसल्या सोप्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करता येऊ शकतं. तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे सरकारी Apps, हे आहेत फायदे Aadhaar Card शी असं लिंक करा Driving License - - लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सर्वात आधी राज्याच्या परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. - इथे लिंक आधारवर क्लिक करुन ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स निवडा. - त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details वर क्लिक करा. - आता तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. - प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा. - त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. - OTP टाकल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
  Published by:Karishma
  First published: