जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / English भाषेत एक्सपर्ट व्हायचंय? Google करेल अशी मदत, नवं फीचर लाँच

English भाषेत एक्सपर्ट व्हायचंय? Google करेल अशी मदत, नवं फीचर लाँच

English भाषेत एक्सपर्ट व्हायचंय? Google करेल अशी मदत, नवं फीचर लाँच

Google ने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी एका खास फीचरची घोषणा केली आहे. Google Search असं नव्या फीचरचं नाव असून यामुळे चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकण्यासाठी मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : Google आपल्या युजर्ससाठी अनेक अपडेट जारी करत असतं. आता Google ने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी एका खास फीचरची घोषणा केली आहे. Google Search असं नव्या फीचरचं नाव असून यामुळे चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकण्यासाठी (English Learning) मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Google Search नवे शब्द शिकण्यास मदत करेल आणि त्यामुळे युजर्सचे भाषा स्किल्स सुधारण्यास मदत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. Google ने एका ब्लॉग पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लोकांच्या दृष्टीने एक सोपी सुविधा आणली आहे, जी वेगवेगळे शब्द जाणून घेण्यास मदत करणार असून युजर्सची उत्सुकताही वाढवेल. हे App इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी आणि अतिशय चांगलं इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी अशा दोन्ही युजर्ससाठी समान रुपात तयार करण्यात आलं आहे.

WhatsApp ने बॅन केली 22 लाखहून अधिक Accounts, चुकूनही करू नका या गोष्टी

अशी होईल Google Search ची मदत - Google Search या नव्या सर्विसद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन रुपात इंग्रजीचा नवा शब्द पाठवला जाईल. यामुळे एक नवा शब्द तुम्हाला समजेल आणि त्याबाबत तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. याने तुमचं इंग्रजी चांगलं होण्यास मदत होईल. पण यासाठी युजर्सला सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सब्सक्राइब केल्यानंतरच युजर्सला दररोज एक नवा शब्द नोटिफिकेशनद्वारे मिळेल.

Google Phones चं सीक्रेट फीचर, प्रायव्हेट फोटो Lock केल्यानंतर कुठेच नाही दिसणार

कसं घ्याल सब्सक्रिप्शन - Google Search चं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी युजरला Sign-up करण्यासाठी Google Search मध्ये कोणत्याही इंग्रजी शब्दाचा अर्थ पाहावा लागेल आणि त्यानंतर उजव्या बाजूला Bell Icon वर क्लिक करावं लागेल. सध्या ही सुविधा केवळ English मध्ये उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात