मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Phones चं सीक्रेट फीचर, प्रायव्हेट फोटो एकदा Lock केल्यानंतर कुठेच नाही दिसणार

Google Phones चं सीक्रेट फीचर, प्रायव्हेट फोटो एकदा Lock केल्यानंतर कुठेच नाही दिसणार

Google Photos साठी एक नवं फीचर आलं आहे. यात युजर्स आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतात.

Google Photos साठी एक नवं फीचर आलं आहे. यात युजर्स आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतात.

Google Photos साठी एक नवं फीचर आलं आहे. यात युजर्स आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतात.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : Google नेहमी आपल्या युजर्सला अनेक सुविधा देत विविध अपडेट जारी करतं. आता Google Photos साठी एक नवं फीचर आलं आहे. यात युजर्स आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतात. Google Photos च्या नव्या फीचरमध्ये तुम्ही तुमचे पर्सनल फोटो आणि व्हिडीओ पासवर्डसह प्रोटेक्ट आणि हाइड करू शकता. या नव्या फीचरचं नाव Locked Folder आहे. यात खास फोटोसाठी एक वेगळं फोल्डर तयार करता येईल. हे फोल्डर तुमच्या फोनच्या पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि पॅटर्न लॉकद्वारे अॅक्सेस करू शकता. फोल्डर असं करा सेटअप - या फोल्डरसाठी तुमच्या स्मार्टफोनवर पासवर्ड लॉक असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोनवर Google Photos App ओपन करा आणि असे फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करा जे तुम्हाला Locked फोल्डरमध्ये मूव्ह करायचे आहेत. त्यानंतर More पर्यायावर क्लिक करुन Moved to locked folder पर्याय दिसेल. कसं शोधाल प्रायव्हेट फोल्डर - लॉक केलेले फोटो-व्हिडीओ हाइड केल्यानंतर पुन्हा पाहायचे असल्यास त्यासाठी पुन्हा Google Photos App ओपन करा. - स्क्रिनवर सर्वात वर चार पर्याय दिसतील. - दुसरा पर्याय Utilities चा दिसेल. त्यावर क्लिक करा. - इथे Locked Folder चा पर्याय दिसेल. - त्यावर क्लिक करुन फोटो-व्हिडीओ पाहता येतील.

Aadhaar Card द्वारे Loan हवंय? सोप्या पद्धतीने असा करा Online अर्ज

काय आहे सेफ्टी फीचर - जे फोटो-व्हिडीओ तुम्ही Locked Folder मध्ये अपलोड कराल, ते तुमच्या इतर फोटोसोबत पाहता येणार नाही. त्याशिवाय हे लॉक केलेले फोटो फोनच्या इतर गॅलरीमध्येही दिसणार नाहीत. Safety Feature अंतर्गत हे फोटो फोनच्या कोणत्याही फोटोबुक किंवा अल्बमध्ये दिसणार नाहीत. हे फीचर सध्या Google ने त्यांच्या फ्लॅगशिप Pixel Smartphone साठी जारी केलं आहे. परंतु लवकरच हे फीचर सर्व Android Phones आणि त्यानंतर iOS डिव्हाइसेजसाठी रोल आउट केलं जाईल.
First published:

Tags: Google, Photos, Tech news

पुढील बातम्या