मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

हॅकर्सकडे आहे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड? वाचा कसं तपासाल

हॅकर्सकडे आहे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड? वाचा कसं तपासाल

सायबर अटॅकनंतर हॅकर्स मोठ्या प्रमाणात पासवर्ड जमा करतात आणि गरज पडेल तसं, आपल्या हिशोबाने त्याचा वापर करतात. म्हणजे तुमचा पासवर्ड हॅकर्सकडे आहे, पण तरीही तुमच्या अकाउंटमध्ये कोणतीही समस्या नाही, असं असल्यास येणाऱ्या काळात तुमचं अकाउंट हॅकर्सच्या टार्गेटवर असण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : सध्या कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ज्या प्रमाणात डिजिटल व्यवहारात वाढ होत आहे, त्याच वेगात बँकिंग फ्रॉड, ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही वाढतं आहे. तसंच पासवर्ड हॅकिंगचं प्रमाणही वाढतं आहे. खराब पासवर्डच्या टॉप-10 लिस्टमध्ये इतके सोपे, कमकूवत पासवर्ड पाहायला मिळाले की, जे कोणीही सहजपणे हॅक करू शकेल. या परिस्थितीत आपला पासवर्ड हॅकर्सच्या हाती लागला की नाही, हे कसं ओळखाल?

मागील कित्येक दिवसांपासून सायबर अटॅकच्या बातम्या वाचल्या-ऐकल्या जात आहेत. सायबर अटॅक एक-दोन नाही, तर लाखो-करोडो अकाउंट्सवर केले जातात. यात सोशल मीडियासह ईमेल आणि बँक अकाउंटही सामिल असू शकतात.

सायबर अटॅकनंतर हॅकर्स मोठ्या प्रमाणात पासवर्ड जमा करतात आणि गरज पडेल तसं, आपल्या हिशोबाने त्याचा वापर करतात. म्हणजे तुमचा पासवर्ड हॅकर्सकडे आहे, पण तरीही तुमच्या अकाउंटमध्ये कोणतीही समस्या नाही, असं असल्यास येणाऱ्या काळात तुमचं अकाउंट हॅकर्सच्या टार्गेटवर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या अकाउंटचा पासवर्ड सेफ आहे की नाही हे समजणं महत्त्वाचं आहे. परंतु सेफ नसल्यास, त्वरित अकाउंटचा पासवर्ड बदलावा.

(वाचा - Latest Covid-19 Updates: WHO कडून नवीन App लाँच, मिळणार अधिकृत माहिती)

गुगलने काही दिवसांपूर्वी एक टूल लाँच केलं होतं. या टूलद्वारे युजर्स पासवर्ड लीक झाला की नाही ते समजू शकतात. तसंच तुमचा पासवर्ड किती कमजोर आहे किंवा किती अकाउंट्ससह वापरला गेला आहे, याचीही माहिती मिळते. हे तपासण्यासाठी passwords.google.com वर अकाउंट लॉग इन करावं लागेल. इथे पासवर्ड चेकअपचा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप केल्यानंतर गुगल काही माहिती देईल.

(वाचा - ना सेंड बटण, ना कोणतीही चॅट हिस्ट्री; आता करा रियल टाईम चॅटिंग,पाहा काय आहे App)

गुगल सेव्ह पासवर्डच्या आधारे सांगेल की, पासवर्ड कॉम्प्रोमाइज्ड आहे की एखाद्या डेटा लीकमध्ये लिक झाला आहे. किती पासवर्ड दुसऱ्यांदा वापरले गेले आहेत आणि पासवर्ड किती कमजोर आहे. कॉम्प्रोमाइज्ड पासवर्डवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईटवर लॉग इन केलेले पासवर्ड दिसतील, जे कधी ना कधी डेटा लीक वेळी लीक झाले आहेत. येणाऱ्या काळात यामुळे युजर अकाउंट हॅक होऊ शकतं.

गुगलच्या या टूलमध्ये लिस्टसमोर एक चेंज पासवर्ड ऑप्शन मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटवर जाल, ज्याचा पासवर्ड लीक झाला आहे. इथे पासवर्ड बदलताही येतो.

(वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज)

गुगलची आणखी एक अशी वेबसाईट आहे, जी डेटा ब्रीचमध्ये किती वेळा तुमचा ईमेल आयडी प्रभावित झाला, ते सांगेल. haveibeenpwned.com वर युजरला आपला ईमेल आयडी एंटर करावा लागेल. आयडी एंटर केल्यावर कधी आणि कोणत्या वेबसाईटवर तुमचा ईमेल आयडी प्रभावित झाला ते समजेल. कोणत्या डेटा लीकमुळे युजरचा आयडी लीक झाला तेदेखील समजू शकते, त्यानंतर याला सिक्योरही करता येतं. यासाठी स्ट्राँग पासवर्ड आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन आवश्यक आहे.

First published:

Tags: Cyber crime, Password