मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ना सेंड बटण, ना कोणतीही चॅट हिस्ट्री; आता करा रियल टाईम चॅटिंग, जाणून घ्या या अनोख्या App बद्दल

ना सेंड बटण, ना कोणतीही चॅट हिस्ट्री; आता करा रियल टाईम चॅटिंग, जाणून घ्या या अनोख्या App बद्दल

या अ‍ॅपमध्ये एखाद्याशी चॅट करताना जे काही टाईप केलं जाईल, ते समोरच्याला दिसायला टाईप होतानाच दिसू लागेल. यात रियल टाईम फोटो आणि इमोजीही पाठवता येतात.

या अ‍ॅपमध्ये एखाद्याशी चॅट करताना जे काही टाईप केलं जाईल, ते समोरच्याला दिसायला टाईप होतानाच दिसू लागेल. यात रियल टाईम फोटो आणि इमोजीही पाठवता येतात.

या अ‍ॅपमध्ये एखाद्याशी चॅट करताना जे काही टाईप केलं जाईल, ते समोरच्याला दिसायला टाईप होतानाच दिसू लागेल. यात रियल टाईम फोटो आणि इमोजीही पाठवता येतात.

  नवी दिल्ली, 26 डिसेंबर : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटनंतर आता आणखी एक इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आलं आहे. पण हे अ‍ॅप इतर अ‍ॅप्सपेक्षा वेगळं असून याचे फीचर्सही निराळे आहेत. हे एक रियल टाईम अ‍ॅप असल्याचं बोललं जात आहे. Honk असं या अ‍ॅपचं नाव आहे. Honk अ‍ॅपमध्ये कोणाशीही चॅट करताना, तुम्ही काय टाईम करत आहात, ते दुसरीकडे रियल टाईम दिसेल. इतर अ‍ॅप्समध्ये चॅटवेळी समोरचा टाईप करत असताना, केवळ टायपिंग असं दिसतं. परंतु Honk मध्ये समोरचा टाईप करत असतानाच रियल टाईम अर्थात काय टाईप करतोय ते दिसत जाईल. Honk अ‍ॅपने युजर्सला रियल टाईम एक्स्पिरिएंस देण्याबाबत सांगितलं आहे. या अ‍ॅपमध्ये चॅट करताना याचं कोणी ट्रेसिंगही ठेऊ शकत नाही. कारण यात मेसेज रियल टाईम गायबही होतील. अशाच प्रकारचं एक फीचर सध्या इन्स्टाग्रामवरही आलं आहे.

  (वाचा - Instagram चं नवं Vanish Mode फीचर; आता चॅटिंगमध्ये होणार असा बदल)

  या अ‍ॅपमध्ये सेंड बटण किंवा चॅट हिस्ट्रीसारखी कोणतीही गोष्ट नाही. यात एक रिफ्रेश बटण देण्यात आलं आहे, जे वापरून पुन्हा टेक्स्ट टाईप करू शकतो. हे एक प्रकारचं रियल टाईम चॅटिंग अ‍ॅप आहे. चॅटिंगवेळी एखाद्या निघून गेल्यास, ते नोटिफिकेशनही समोरच्याला मिळतं. या चॅट अ‍ॅपमध्ये एक Honk बटण देण्यात आलं आहे. ते प्रेस केल्यास दुसऱ्या व्यक्तीला नोटिफिकेशन मिळेल. एखादा मित्र हे अ‍ॅप वापरत नसेल तरीही त्याला Honk पाठवता येतं. या अ‍ॅपमध्ये एखाद्याशी चॅट करताना जे काही टाईप केलं जाईल, ते समोरच्याला टाईप होतानाच दिसू लागेल. यात रियल टाईम फोटो आणि इमोजीही पाठवता येतात. या अ‍ॅपमध्ये सेंड बटण नाही, कारण तुम्ही जे टाईप केलंय, ते तुमच्या मित्राने रियल टाईममध्ये वाचलं आहे, त्यामुळे येथे सेंड बटणची गरज नाही. या चॅटिंगची हिस्ट्रीही राहत नाही.

  (वाचा - OPPO चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

  सिक्योरिटी आणि प्रायव्हसी फ्रंटवर या अ‍ॅपबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु कंपनीने चॅट स्टोर होणार नाही आणि हिस्ट्रीही सेव्ह होणार नसल्याचं सांगितलं आहे. यात एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे की नाही याबाबतही सध्या कोणतीही माहिती नाही. Honk अ‍ॅप सध्या केवळ iPhone युजर्ससाठीच उपलब्ध आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या