नवी दिल्ली, 16 मार्च : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) एक असं माध्यम आहे, ज्यावर मोठ्या प्रमाणात युजर्स आपला वेळ घालवतात. या प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ पाहण्यासह, युजर्स अनेक पोस्टही करत असतात. कुठेही फिरायला जाताना ते लोकेशनही शेअर करता येतं. हे सर्व बेसिक फीचर्स असून सर्वच युजर्स याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
फेसबुकवर अनेक युजर्स आपल्या मित्र-मैत्रिणीचं प्रोफाईलही चेक करत असतात. अनेकदा फेसबुकद्वारे एखाद्यावर नजर ठेवली जात असल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. असा प्रकार धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे कोणी तुमच्या अकाउंटवर नजर तर ठेवत नाही ना? हे पाहण्यासाठी काही स्टेप्सद्वारे याची माहिती मिळवता येऊ शकते.
तुमचं फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिलं, असं घ्या जाणून -
- या स्टेप्स फॉलो करण्यासाठी Facebook च्या वेब वर्जनचा वापर करावा लागेल.
- सर्वात आधी फेसबुक अकाउंट ओपन करा. येथे लॉगइन करण्यासाठी facebook.com वर जावं लागेल.
- फेसबुक अकाउंट ओपन झाल्यानंतर, पेजवर राईट क्लिक करा.
- त्यानंतर View Page Source पर्यायावर क्लिक करा.
- पेज सोर्स ओपन झाल्यानंतर CTRL+F करावं लागेल. सर्च बार ओपन झाल्यानंतर 'BUDDY ID' टाईप करावा लागेल. त्यानंतर एंटर करा.
- काही फेसबुक प्रोफाईल आयडी, BUDDY_ID मध्ये लिहिलेली दिसतील.
- यापैकी एका आयडीला कॉपी करा आणि त्यानंतर नवीन टॅब ओपन करा. त्यानंतर Facebook.com/15-digit ID लिहून एंटर करा. हा त्या व्यक्तीचा आयडी असेल ज्याने तुमचं प्रोफाईल ओपन करुन पाहिलं असेल.
यासाठी दुसरा पर्याय -
आपलं फेसबुक अकाउंट कोणी-कोणी पाहिलं यासाठी आणखी एक पर्याय आहे. यासाठी गुगल प्ले स्टोरवर अनेक Apps आहेत. त्यापैकी Who Viewed My Profile हे App वापरता येऊ शकतं.
- हे App गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड केल्यानंतर Instagram, Facebook, Whatsapp या तीनपैकी एकावर टॅप करा. या App द्वारे युजर तीनही App च्या व्हिजिटर्सबाबत माहिती घेऊ शकतो.
- ज्या व्हिजिटरला पाहायचं आहे, त्या App वर लॉगइन करा. त्यानंतर त्या सर्व लोकांचं प्रोफाईल पाहायला मिळेल, ज्याने तुमचा आयडी पाहिलं आहे. त्यावर टॅप करुन युजर प्रोफाईलचं नाव पाहू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook