मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Account, या सोप्या पद्धतीने करा Secure

हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Account, या सोप्या पद्धतीने करा Secure

WhatsApp आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी नवे अपडेट, सिक्योरिटी फीचर्स देत असतं. WhatsApp असेही काही फीचर्स देतं ज्याद्वारे तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर होत नाही ना याची माहिती मिळवता येते.

नवी दिल्ली, 28 जानेवारी : इंटरनेटच्या वाढत्या जगात सायबर हॅकर्सकडून (Hackers) अनेकांची फसवणूक होते आहे. तुमची एक लहानशी चूकही फ्रॉडसाठी (Online Fraud) कारणीभूत ठरू शकते. यामुळे बँक अकाउंटला धोका निर्माण होतो. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती लीक होते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबुक किंवा कोणत्याही प्रकारचं ऑनलाइन ट्रेडिंग करताना सावधपणे करणं गरजेचं आहे.

हॅकर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निशाणा करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास सर्वच जण इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. सायबर क्रिमिनल्स नव्या-नव्या पद्धतींने लोकांना टार्गेट करत आहेत. जर तुम्हाला तुमच्या WhatsApp अकाउंटमध्ये काही चुकीच्या किंवा संशयास्पद, तुम्ही न केलेल्या गोष्टी दिसत असतील तर तुमचं अकाउंट हॅक झाल्याचं समजावं. इतर दुसरा कोणी व्यक्ती अकाउंटचा वापर करत असून त्याद्वारे अकाउंट हँडल केलं जातं.

WhatsApp आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी नवे अपडेट, सिक्योरिटी फीचर्स देत असतं. WhatsApp असेही काही फीचर्स देतं ज्याद्वारे तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर होत नाही ना याची माहिती मिळवता येते.

हे वाचा - क्या बात है! आता आपली ओळख लपवूनही फेसबुकवर करू शकता Post; कसं ते समजून घ्या

कॉल हिस्ट्री (Call History) -

वेळोवेळी WhatsApp Activity चेक करणं गरजेचं आहे. कॉल हिस्ट्री तपासणंही आवश्यक आहे. एखादा असा कॉल नाही ना ज्याची तुम्हाला माहिती नाही. अनोळखी कॉल, मेसेज आणि लिंकवर क्लिक करू नका. तुमची पर्सनल माहिती कोणताही देऊ नका.

Contact -

WhatsApp Account मध्ये कॉन्टॅक्टची माहिती ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा हॅकर्स अकाउंट हॅक केल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये बदल करण्यास सुरुवात करतात. जर तुम्हाला अकाउंटमध्ये अचानक असे काही बदल दिसल्यास अलर्ट व्हा.

WhatsApp मध्ये Linked Device नावाने एक ऑप्शन दिला जातो. इथे तुमच्या अकाउंटशी इतर कोणतं अकाउंट लिंक नाही ना हे सहजपणे तपासू शकता. जर असं अकाउंट आढळलं तर ते लगेच डिलीट करा.

हे वाचा - WhatsApp च्या Security साठी मिनिटांत अ‍ॅक्टिवेट करा Two Step Verification

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) -

WhatsApp अधिक सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा दिली आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर नव्या डिव्हाइसमध्ये WhatsApp लॉगइन केल्यास OTP मागितला जाईल. तो ओटीपी नंबर टाकून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अधिक सुरक्षित होण्यास मदत होते.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp New Feature, WhatsApp user