जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp च्या Security साठी मिनिटांत अ‍ॅक्टिवेट करा Two Step Verification, पाहा सोपी प्रोसेस

WhatsApp च्या Security साठी मिनिटांत अ‍ॅक्टिवेट करा Two Step Verification, पाहा सोपी प्रोसेस

WhatsApp च्या Security साठी मिनिटांत अ‍ॅक्टिवेट करा Two Step Verification, पाहा सोपी प्रोसेस

तुम्हाला फोनमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन करायचं असल्यास काही स्टेप्स फॉलो करुन सिक्योरिटी अ‍ॅड करता येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 जानेवारी : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या वेब आणि डेस्कटॉप युजर्ससाठी 2 स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) आणण्याची तयारी करत आहे. WABetaInfo रिपोर्टनुसार, फेसबुकची (Facebook) इन्स्टंट मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअ‍ॅप एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे वेब आणि डेस्कटॉप युजर्सला अ‍ॅडिशनल सिक्योरिटी मिळेल. एकदा टू-स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करण्यासाठी आणि अकाउंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी 6 डिजीट PIN टाकावा लागेल. ज्यावेळी तुम्ही नव्या स्मार्टफोनद्वारे WhatsApp वर लॉगइन (WhatsApp Login) करता, त्यावेळी अ‍ॅप एक 6 डिजीट कोड मागतो. हा कोड तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो. व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी (WhatsApp Web) टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरवर काम सुरू आहे. परंतु तुम्हाला फोनमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन करायचं असल्यास काही स्टेप्स फॉलो करुन सिक्योरिटी अ‍ॅड करता येईल.

हे वाचा -  Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी

- सर्वात आधी WhatsApp ओपन करा. - त्यानंतर Settings मध्ये जा. - आता Accounts वर टॅप करा. त्यानंतर टू-स्टेप वेरिफिकेशनवर जा आणि Enable करा. - आता तुम्हाला हवा तो 6 डिजीट PIN टाका आणि कन्फर्म करा. इथे अशा पीन नंबरचा वापर करा जो युनिक असेल आणि तुमच्या सहज लक्षात राहील. - आता तुम्ही अ‍ॅक्सेस करत असलेला ईमेल आयडी टाका. ईमेल आयडी टाकायचा नसेल, तर ही प्रोसेस Skip करता येते. परंतु ईमेल आयडी टाकणं फायद्याचं ठरतं, जेणेकरुन Two Step Verification रिसेट करता येईल. यामुळे WhatsApp Account अधिक सुरक्षित होऊ शकतं. - Next वर टॅप करा. - Email ID कन्फर्म करा आणि Save वर टॅप करुन Done करा.

हे वाचा -  आता WhatsApp होणार अधिक सुरक्षित, विना 6 डिजीट PIN लॉगइन करू शकणार नाही युजर्स

जर तुम्ही ईमेल आयडी अ‍ॅड करत नसाल आणि PIN विसरलात तर पीन रिसेट करण्यासाठी 7 दिवस लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात