Home /News /technology /

क्या बात है! आता आपली ओळख लपवूनही फेसबुकवर करू शकता Post; कसं? समजून घ्या संपूर्ण Process

क्या बात है! आता आपली ओळख लपवूनही फेसबुकवर करू शकता Post; कसं? समजून घ्या संपूर्ण Process

अशी करा फेसबुक ग्रुपमध्ये पोस्ट

अशी करा फेसबुक ग्रुपमध्ये पोस्ट

इतरांना कळणार नाही कुणी पोस्ट टाकली आहे. ग्रुपच्या अॅडमिन किंवा मॉडरेटरच्या मंजुरीनंतरच (approved) निनावी पोस्ट ग्रुप मध्ये दिसतील.

    मुंबई, 27 जानेवारी:   तुम्ही तुमचं यूजरनेम (user name ) उघड न करता फेसबुक ग्रुपमध्ये (Facebook group ) काहीतरी पोस्ट करण्याचा विचार केला आहे का? तुम्हाला कदाचित वाटेल ते शक्य नाही, पण आता हे शक्य आहे. तुम्ही anonymous पोस्टिंग फीचर (anonymous posting Feature) वापरून हे करू शकता. पण ग्रुपच्या सदस्यांना स्वतःचं नाव न टाकता काहीतरी पोस्ट करण्याची परवानगी देण्यासाठी ग्रुप अॅडमिनला हे फीचर एनेबल करावं लागेल. हे फीचर एनेबल असलेल्या फेसबूक ग्रुपमध्ये त्या ग्रुपच्या सदस्यांना त्यांचं नाव न टाकताही पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य मिळेल. अर्थात तुम्ही ग्रुपमध्ये स्वतःचं नाव न वापरता म्हणजेच निनावी पोस्ट टाकली असली तरी ही पोस्ट कोणी टाकली आहे, हे ग्रुप अॅडमिन, मॉडरेटर आणि फेसबूक टीम फक्त यांना दिसेल. इतरांना कळणार नाही कुणी पोस्ट टाकली आहे. ग्रुपच्या अॅडमिन किंवा मॉडरेटरच्या मंजुरीनंतरच (approved) निनावी पोस्ट ग्रुप मध्ये दिसतील. स्वतःचं नाव न उघड करता अशी करा फेसबुक ग्रुपमध्ये पोस्ट - फेसबुक सपोर्टेड डिव्हाइसमध्ये तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून फेसबुक लॉग इन करा - मेनूच्या साइडबारवर, “Groups.” ऑप्शनवर क्लिक करा. - एक ग्रुप निवडा ज्यामध्ये तुम्हाला निनावीपणे काहीतरी पोस्ट करायचं आहे. जर त्या ग्रुपच्या अॅडमिनने anonymous पोस्टिंग फीचर एनेबल केलं असेल, तर तुम्हाला “Anonymous Post” हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे? आधी 'या' गोष्टींची करा खातरजमा - आता, फेसबुकने दिलेल्या विंडोच्या तळाशी असलेल्या “Create Anonymous Post” वर क्लिक करा ज्यामध्ये काही डिस्क्लेमरदेखील आहेत. - तुमच्या स्क्रीनवर “Create Post” विंडो दिसेल. आता, तुम्ही फेसबुकवर जसं पोस्ट करता तसं पोस्ट करू शकता. - तुमची पोस्ट पूर्ण लिहून झाल्यानंतर “Submit.” वर क्लिक करा. - तुमची पोस्ट ग्रुप अॅडमिन्स आणि मॉडरेटरकडे सबमिट केली जाईल. -तुमची पोस्ट प्रकाशित केली जाईल आणि ग्रुप अॅडमिन्स किंवा मॉडरेटरकडून मंजूर ( approved ) केल्यानंतर ती ग्रुपमध्ये दिसेल. कोणत्याही फेसबुक ग्रुपचा सक्रिय सदस्य हा ग्रुप अॅडमिनला ग्रुपच्या सदस्यांसाठी Anonymous पोस्टिंग फीचर एनेबल करण्याची विनंती करू शकतो. ग्रुप अॅडमिन फेसबुक ग्रुपमध्ये Anonymous पोस्टिंग फीचर एनेबल कसं करू शकतात ते जाणून घेऊयात. - तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉग इन करा - Groups ऑप्शनवर जाऊन तेथे तुम्ही अॅडमिन असलेल्या ग्रुपची निवड करा. - निवडलेल्या ग्रुपमधील “Admin Tools” या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा. तेथे “Settings” वर क्लिक करा - “Anonymous Posting” हा ऑप्शन निवडा, आणि तो ऑन करा. - तुमच्या फेसबुक ग्रुपमधील anonymous पोस्ट एनबेल ( enable ) करण्यासाठी विंडोच्या तळाशी असलेल्या “Save” वर क्लिक करा. फेसबुक सातत्याने आपल्या यूजरसाठी नवनवीन फीचर आणत असते. फेसबुकमध्ये नवीन कोणतं फीचर येत आहे, याकडे यूजरचे लक्ष असतं. आता फेसबुकने आणलेलं हे नवीन फीचर यूजरला किती पसंत पडतं, हे पाहावं लागेल.
    First published:

    Tags: Facebook, Technology

    पुढील बातम्या