नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या ठिकाणी याचा वापर योग्य ठरतो, परंतु याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच गुगलनेही लोकांची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पाहता थर्ड पार्टी App द्वारे होणाऱ्या कॉल रेकॉर्डिंगवर बंदी आणली. अँड्रॉइडच्या ज्या फोनमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर आहे, त्यात अद्यापही इनबिल्ट फीचर असल्याने कॉल रेकॉर्ड करता येतो. पण समोरचा तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय हे कसं समजेल? एका ट्रिकद्वारे तुम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड होतेय की नाही याची माहिती मिळवू शकता.
कॉल रेकॉर्डिंगची माहिती मिळवण्यासाठी अलर्ट राहण्याची गरज आहे. ज्यावेळी कोणता कॉल येईल, त्यावेळी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- अँड्रॉइड फोनमध्ये ज्यावेळी डिफॉल्ट फीचरचा वापर करुन कॉल रेकॉर्डिंग केलं जातं, त्यावेळी बीप-बीप आवाज येतो. त्यामुळे कॉलवेळी असा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत असल्याचं समजू शकतं. काही देशात कॉल रेकॉर्डिंगवर पूर्णपणे बंदी आहे. अशात मोबाइल निर्मात्या कंपन्या बीपचा ऑप्शन देतात, जेणेकरुन रेकॉर्डिंगची स्थिती समजू शकेल. तसंच सर्वच फोनमध्ये हे फीचर उपलब्ध असतंच असं नाही.
- कॉल रिसिव्ह केल्याकेल्या बीप आवाज आला तर तो कॉल रेकॉर्डिंगचा संकेत आहे. फोन उचलल्यावर असा आवाज आल्यास कॉल रेकॉर्डिंग होऊ शकतं.
- तुमच्या फोनच्या स्क्रिनवरही लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कमांड न देताच नोटिफिकेशन बारवर माइकचा आयकॉन असेल, तर कोणी तुम्हाला ऐकत असून तुमच्या गोष्टी त्यालाही ऐकू येत असल्याचं असू शकतं.
- अनेक फोनमध्ये डिफॉल्ट रेकॉर्डिंगचा ऑप्शन नसतो. अशात लोक स्पीकरवर ठेवून बोलतात आणि दुसऱ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करतात. अशात स्पीकर ऑन असल्याचं ओळखता येणं गरेजचं आहे. स्पीकर ऑन करुन बोलत असल्यास आवाज गुमतो, त्यामुळे फोन स्पीकर असेल असं समजू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news, Truecaller