Home /News /technology /

Amazon Prime वर फ्रीमध्ये मेंबर होण्याची संधी, पाहा काय आहे प्रोसेस

Amazon Prime वर फ्रीमध्ये मेंबर होण्याची संधी, पाहा काय आहे प्रोसेस

Amazon 17 जानेवारीपासून आपल्या Great Republic Day Sale ची सुरुवात करत आहे. परंतु Amazon Prime मेंबर्सकडे खास संधी आहे. फ्रीमध्ये कसे बनाल Amazon Prime मेंबर?

  नवी दिल्ली, 16 जानेवारी : Amazon 17 जानेवारीपासून आपल्या Great Republic Day Sale ची सुरुवात करत आहे. परंतु Amazon Prime मेंबर्सकडे खास संधी आहे. Amazon Prime मेंबर्स या सेलचा फायदा एक दिवस आधीच घेऊ शकतात. Amazon Prime मेंबरशिप हवी असल्यास, एक दिवस आधी Amazon Great Republic Day Sale चा Early Access मिळू शकतो. फ्रीमध्ये Amazon Prime मेंबर बनून या सेलचा फायदा घेऊ शकता. फ्रीमध्ये कसे बनाल Amazon Prime मेंबर? - सर्वात आधी Amazon App डाउनलोड करावं लागेल. - App वर Amazon Great Republic Day Sale चा एक बॅनर दिसेल. - त्या बॅनरवर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर पुढील पेजवर Enjoy Prime For Free लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. - इथे Choose Your Prime Plan दिसेल, ज्यात पहिला पर्याय Try Prime Free दिसेल. - त्यात Start Your 30 Day Free Trial पर्यायावर क्लिक करा.

  हे वाचा - Stock Marketमध्ये ट्रेडिंग करणं होईल सोपं,या Mobile Appवर मिळतील Investment Tips

  महत्त्वाची बाब म्हणजे या फ्री ट्रायलमध्ये रजिस्टर करण्याआधी एक बाब लक्षात ठेवा, की 30 दिवसांनंतर तुमच्याकडून रजिस्टर केलेल्या कार्डमधून 1499 रुपये आपोआप कट होतील. तसंच Amazon Prime Subscription कॅन्सल करण्याचा पर्यायही मिळेल. अशाप्रकारे 30 दिवसांसाठी Amazon Prime Membership चा फायदा घेऊन Amazon Great Republic Day Sale चा एक दिवस आधी Early Access मिळवू शकता.

  हे वाचा - Gpay Account असलेला Android फोन हरवला किंवा चोरी झाल्यास लगेच करा हे काम

  Amazon Prime Membership Plan - Amazon Prime Membership साठी 3 प्लान आहेत. महिन्याचा प्लान 179 रुपये, तीन महिन्याचा प्लान 450 रुपये, 12 महिन्याचा प्लान 1499 रुपयांचा आहे. फ्री ट्रायल संपल्यानंतर तुमच्या हिशोबाने हवा तो प्लान सिलेक्ट करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Amazon subscription, Tech news

  पुढील बातम्या