नवी दिल्ली, 16 जानेवारी : इंटरनेट जगात आता अनेक कामं स्मार्टफोनद्वारे केली जातात. पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही Google Pay सारख्या ऑनलाइन पेमेंट App चा वापर केला जातो. परंतु Gpay Account असलेला फोन हरवला किंवा चोरीला गेला तर चुकीच्या हातामध्ये जावून नुकसान होऊ शकतं. त्यामुळे Google Pay असलेला फोन हरवला तर काही महत्त्वाची पाऊल उचलणं गरजेचं आहे.
पेमेंट बेस्ड टेक कंपन्या युजर्ससाठी एक्स्ट्रा सिक्योरिटी ऑफर करतात. याद्वारे ते App साठी पासकोड सेट करू शकतात. लोक सिक्योरिटीसाठी फोनमध्ये स्क्रिन लॉकचा वापर करू शकतात. परंतु हॅकर्स सहजपणे याला क्रॅक करू शकतात.
अशात एका ट्रिकद्वारे तुम्ही रिमोटली आपल्या हरवलेल्या अँड्रॉइड फोनद्वारे Gpay Account हटवू शकता. Gpay Account असलेला फोन हरवला तर सर्वात आधी दुसऱ्या फोनवरुन 18004190157 नंबर डायल करावा लागेल.
त्यानंतर Other Issues ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा कॉल कस्टमर केयर एजेंटशी कनेक्ट होईल. ते गुगल अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी तुमचा रजिस्टर्ड गुगल अकाउंट आणि मोबाइल नंबर वेरिफाय करावा लागेल.
त्याशिवाय अल्टरनेट मेथडही ट्राय करू शकता. याद्वारे अँड्रॉइड अकाउंटने सर्व डेटा रिमोटली डिलीट करू शकता. त्यासाठी android.com/find ब्राउजर ओपन करावं लागेल. त्यानंतर Google Account मध्ये साइन-इन करावं लागेल.
Google Find My Device मध्ये तुम्हाला Play Sound, Secure Device आणि Erase Device ऑप्शन दिसतील. यात Erase Device ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर खाली स्क्रोल करुन Erase Device वर क्लिक केल्यानंतर फोनचा डेटा रिमोटली डिलीट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.