Home /News /technology /

मिनिटांत फ्री होईल स्टोरेज, डिलीट होतील नको असलेले Apps; Smartphone फास्ट होण्यासाठी या ट्रिक्स पाहाच

मिनिटांत फ्री होईल स्टोरेज, डिलीट होतील नको असलेले Apps; Smartphone फास्ट होण्यासाठी या ट्रिक्स पाहाच

अनेकदा स्मार्टफोनमध्ये हेवी फाइल डाउनलोड करताना Out Of Storage असा मेसेज येतो. फोनमध्ये जागा नसल्याने ही समस्या येते. पण काही सोप्या पद्धतींनी Internal Storage फ्री करुन फोनचा परफॉर्मेन्स चांगला करता येतो.

  नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : Smartphone मध्ये अनेकदा स्पेस कमी पडत असल्याने समस्या येते. तुमच्या फोनचं स्टोरेज 128 GB किंवा 64 GB हून कमी असल्यास हेवी फाइल डाउनलोड करताना Out Of Storage असा मेसेज येतो. Android Smartphone मध्ये महत्त्वाची बाब म्हणजे यात अनेक कस्टमाजेशन ऑप्शन मिळतात. पण हळू-हळू इंटरनल मेमरी भरते. काही सोप्या पद्धतींनी Internal Storage फ्री करुन फोनचा परफॉर्मेन्स चांगला करता येतो. Smartphone मध्ये अनेकदा सर्वच फाइल आणि Apps असणं आवश्यक वाटतं. त्यापैकी काहीच डिलीट करता येत नाही. काही सोप्या स्टेप्सने स्टोरेज कमी करता येऊ शकतं. - Smartphone च्या Settings मध्ये जा. - इथे Storage पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर फाइल कॅटेगरीची लिस्ट आणि किती स्पेस आहे हे दाखवलं जाईल. - 'Free Up Space पर्यायावर क्लिक करा. - Remove Items Feature ची निवड करण्याचा ऑप्शन दिसेल. - Remove Items Feature असे फोटो आणि व्हिडीओ हटवण्याचा पर्याय देईल, ज्याचा बॅकअप तुम्ही घेतला असेल. Cache Memory क्लियर - फोनची अधिकतर मेमरी Cache मध्ये जाते. त्यामुळे ते क्लियर करणं गरजेचं आहे. फोनच्या सेटिंग्समधून स्टोरेज पर्यायावर जा. इथे Cache क्लियर करा. यामुळे तुमची कोणतीही फाइल डिलीट होणार नाही. त्याशिवाय, स्मार्ट स्टोरेज टॉगल, स्मार्टफोन स्टोरेज फ्री करण्याचा एक पर्याय आहे. ज्यावेळी स्मार्ट स्टोरेज टॉगल ऑन असतं, त्यावेळी डिव्हाइस 30, 60 किंवा 90 दिवसांनंतर बॅकअप फोटो आपोआर हटवतो. स्टोरेज फुल झाल्यावरही हा बॅकअप केलेल्या फाइल्स डिलीट करतो. मिनिटांत फ्री होईल स्टोरेज, डिलीट होईल नको असलेले Apps; Smartphone फास्ट होण्यासाठी या ट्रिक्स पाहाच

  WhatsApp Payment: 5 वेळा मिळणार 51 रुपयांचा Cashback, पाहा काय आहे ऑफर

  स्मार्टफोनमधून Unused Apps कसे हटवाल? - तुमच्या फोनवर Play Store ओपन करा. - त्यानंतर डाव्या बाजूला मेन्यूमध्ये My apps and games वर जा. - टॉप मेन्यू लाइनवरुन Installed वर टॅप करा. - इथे टॉप लाइनवर, उजव्या साइटला On this device पाहा, जो लिस्टला फिल्टर करण्याचा ऑप्शन देते. - इथे Last Used निवडा. ज्या App चा सर्वाधिक उपयोग केला आहे, ते वर दिसतील. लिस्टमध्ये खाली दाखवल्या गेलेल्या Apps ला गरजेनुसार हटवू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone, Tech news

  पुढील बातम्या