मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या जवळपास Aadhaar सेवा केंद्र कुठे आहे? फोनच्या मदतीनं अगदी सहज शोधा सेंटर

तुमच्या जवळपास Aadhaar सेवा केंद्र कुठे आहे? फोनच्या मदतीनं अगदी सहज शोधा सेंटर

जर तुम्हाला कोणाचं आधार कार्ड बनवायचं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुमच्या जवळपास आधार सेवा केंद्र कुठे आहे हे शोधणं गरजेचं ठरतं.

जर तुम्हाला कोणाचं आधार कार्ड बनवायचं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुमच्या जवळपास आधार सेवा केंद्र कुठे आहे हे शोधणं गरजेचं ठरतं.

जर तुम्हाला कोणाचं आधार कार्ड बनवायचं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुमच्या जवळपास आधार सेवा केंद्र कुठे आहे हे शोधणं गरजेचं ठरतं.

नवी दिल्ली, 27 एप्रिल: देशातील प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्वांसाठीच ते अनिवार्य आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ते सरकारी आणि खासगी संस्था, सेवांसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणाचं आधार कार्ड बनवायचं असेल किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुमच्या जवळपास आधार सेवा केंद्र कुठे आहे हे शोधणं गरजेचं ठरतं. आधारमध्ये नवा मोबाईल नंबर किंवा पत्ता, फोटो बदलायचा असेल, तर आधार सेवा केंद्रात जावं लागतं.

आधार सेवा केंद्र ऑनलाईनही शोधता येतं. यासाठी UIDAI ने युजर्ससाठी जवळपासचं आधार सेवा केंद्र ऑनलाईन शोधण्यासाठी काही स्टेप्स सांगितल्या आहेत. त्याशिवाय युजर्स आपल्या फोनद्वारेही जवळचं आधार सेवा केंद्र सर्च करू शकतात.

ऑनलाईन Aadhaar Seva Kendra कसं शोधाल?

आधार सेवा केंद्र आठवड्याचे सातही दिवस सुरू असतं. आधार केंद्र सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सुरू असतं.

- ऑनलाईन आधार सेवा केंद्र शोधण्यासाठी सर्वात आधी UIDAI ची वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जावं लागेल.

- त्यानंतर My Aadhaar section मध्ये जावं लागेल.

- त्यानंतर गेट आधार ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

(वाचा - Online ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नव्या गाइडलाइन्स जारी; असा करा अर्ज)

- आता लोकेट एन एनरोलमेंट सेंटर लिंकवर क्लिक करावं लागेल.

- येथे युजर्स आपलं राज्य, पोस्टल, पिन कोड, शहर, जिल्ह्याचं नाव टाकून आपल्या जवळचं आधार सेवा केंद्र शोधू शकतात.

- संपूर्ण माहिती फॉर्ममध्ये भरल्यानंतर, ऑटो-जनरेट कॅप्चा टाईप करावा लागेल.

- आता लोकेट ए सेंटर बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर जवळच्या आधार सेवा केंद्राची माहिती मिळेल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone, Tech news, Technology, UIDAI