मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लॉकडाउनमध्ये Driving License ची वैधता संपली? Online ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नव्या गाइडलाइन्स जारी; असा करा अर्ज

लॉकडाउनमध्ये Driving License ची वैधता संपली? Online ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नव्या गाइडलाइन्स जारी; असा करा अर्ज

जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपार्य झालं असेल, तर ते रिन्यू करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी मिळतो. कोरोना काळात RTO ऑफिसमध्ये जावं लागू नये, यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अप्लाय करता येऊ शकतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 एप्रिल: रस्त्यावर वाहन चालवताना Driving License एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. जर तुम्ही विना ड्रायव्हिंग लायसन्स ड्राईव्ह करत असाल, तर दंड भरावा लागू शकतो. ड्रायव्हिंग लायसन्स बनवल्यानंतर 20 वर्षांपर्यंत ते वैध असतं. जर ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपार्य झालं आणि ते रिन्यू केलं नाही, तर पुन्हा एकदा लर्निंग लायसन्स बनवावं लागेल आणि त्यानंतर परमनेंट लायसन्स मिळेल. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स वेळेत रिन्यू करणं गरजेचं आहे.

Driving License ची वैधता संपल्यानंतर मिळतो इतका कालावधी -

जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपार्य झालं असेल, तर ते रिन्यू करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी मिळतो. कोरोना काळात RTO ऑफिसमध्ये जावं लागू नये, यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अप्लाय करता येऊ शकतं. ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या करता येऊ शकते.

- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करण्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर https://parivahan.gov.in/ क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर होम पेजवर ऑनलाईन सर्विस आणि ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विसवर क्लिक करावं लागेल.

- एक पेज ओपन होईल, जिथे तुमच्या राज्याचं नाव निवडावं लागेल.

(वाचा - Cyber Crime: कोणत्याही फ्रॉडसाठी अशाप्रकारे करा तक्रार;जाणून घ्या हेल्पलाईन नंबर)

- राज्याची निवड केल्यानंतर, समोर एक नवं पेज ओपन होईल, त्यात अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

- ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण केल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन समिटचा पर्याय येईल.

- त्याआधी संपूर्ण अ‍ॅप्लिकेशन भरावं लागेल. त्यात विचारले गेलेले महत्त्वाचे डिटेल्स भरावे लागतील.

- त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील.

(वाचा - LPG Gas Cylinder: 819 रुपयांचा गॅस सिलेंडर फक्त 19 रुपयांत; असा घ्या ऑफरचा फायदा)

- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.

- त्यानंतर फी जमा करण्याचा पर्याय येईल, त्यात फी जमा करावी लागेल.

- या प्रोसेसनंतर एक receipt डाउनलोड करुन, ती प्रिंट करा.

First published:

Tags: Driving license, Tech news, Technology, While driving