• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • ना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस

ना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस

FASTag युजर्स ज्यांचं खातं ICICI बँकेशी जोडलेलं आहे, त्यांना देशभरात इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेट्सवर काही फायदे मिळणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 जुलै: भारतात टोल प्लाजावर FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. आता FASTag  ने भारतात काही निवडक पेट्रोल पंपावर सर्वात वेगवान कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंधन भरण्याचा दावा केला आहे. ज्यासाठी FASTag ने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह भागीदारी केली आहे. FASTag युजर्स ज्यांचं खातं ICICI बँकेशी जोडलेलं आहे, त्यांना देशभरात इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेट्सवर काही फायदे मिळणार आहेत. ICICI बँक FASTag युजर्स आता इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूर्णपणे डिजीटलचा अनुभव घेऊ शकतील, तसंच युजर्सचा वेळ वाचण्यासही मदत होईल. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात भारतात जवळपास 3000 इंडियन ऑईल रिटेल आउटलेट्स कव्हर केले जातील. हे सिस्टम इंडियन ऑईलच्या ओटोमेशन सिस्टमसह काम करेल, जे इंधन भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा मॅन्युअल हस्तक्षेप हटवेल. ही भागीदारी ICICI बँक FASTag च्या माध्यमातून पेट्रोल, डिजेलची परवानगी देते.

  (वाचा - तुमचं WhatsApp Chat इतर कोणी पाहत तर नाही ना? या ट्रिकने असं तपासा)

  या सुविधेचा फायदा घेण्यासाठी युजर्सला इंधन भरताना पेट्रोल पंपावर तशी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर FASTag कार नंबर प्लेट स्कॅन करेल. त्यानंतर ग्राहकाला इंधन भरण्यासाठी एक OTP पाठवला जाईल. POS मशिनमध्ये OTP टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  (वाचा - आता तुमचा Mobile Phone चोरी झाल्यास, मोदी सरकारकडून मिळेल अशी सुरक्षा)

  टोल कलेक्शन प्रोसेस अधिक वेगवान, सुलभ व्हावी तसंच टोल प्लाजावर रांगा लावून अधिक काळ वाट पाहावी लागू नये, या उद्देशाने देशात FASTag लागू करण्यात आला. भारतात आतापर्यंत FASTag चे जवळपास 35 मिलियन युजर्स आहेत. FASTag देशभरातील कोणत्याही टोल बूथवर खरेदी करता येतो. FASTag खरेदी करण्यासाठी व्हीकल रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह एका आयडीची गरज असते. टोल प्लाजाशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, ICICI बँक, कोटक बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँकसह 22 बँकांच्या माध्यमातून FASTag खरेदी केला जाऊ शकतो. त्याशिवाय पेटीएम, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टद्वारेही FASTag खरेदी करता येतो.
  Published by:Karishma
  First published: