Home /News /technology /

पाकिस्तानातून चालणारी YouTube, Twitter आणि Facebook अकाउंट्स भारताने केली ब्लॉक, करायचे हे वाईट काम

पाकिस्तानातून चालणारी YouTube, Twitter आणि Facebook अकाउंट्स भारताने केली ब्लॉक, करायचे हे वाईट काम

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फेक न्यूज' (Fake News) आणि 'भारतविरोधी बातम्या' (Anti-India News) पसरवणारी आणि पाकिस्तानातून चालवली जाणारी काही अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश भारत सरकारनं गुप्त माहितीच्या आधारे दिले आहेत.

नवी दिल्ली, 22 जानेवारी: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फेक न्यूज' (Fake News) आणि 'भारतविरोधी बातम्या' (Anti-India News) पसरवणारी आणि पाकिस्तानातून चालवली जाणारी काही अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश भारत सरकारनं गुप्त माहितीच्या आधारे दिले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी शुक्रवारी (21 जानेवारी) याबाबत माहिती दिली. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 यू-ट्यूब चॅनेल्स (You Tube), दोन ट्विटर अकाउंट्स, दोन इन्स्टाग्राम अकाउंट्स, दोन वेबसाइट्स आणि एक फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) दिल्या आहेत. ही सर्व अकाउंट्स पाकिस्तानमधून (Pakistan) ऑपरेट होत आहेत. भारतविरोधी बनावट बातम्या पसरवण्याचं काम या अकाउंट्सच्या माध्यमातून केलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. भारताचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्या मृत्यूशी संबंधित मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्यांचा प्रसार पाकिस्तानमधल्या यू-ट्यूब चॅनेलद्वारे झाल्याचंही लक्षात आलं होतं. त्यानंतर ही सोशल मीडिया अकाउंट्स (Social media accounts) आणि वेबसाइट्सवर भारतीय गुप्तचर संस्था (Indian intelligence agency) बारकाईनं लक्ष ठेवून होत्या. त्यांची कार्यप्रणाली संशयास्पद आढळल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयासमोर ठेवण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यू-ट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची (Subscribers) संख्या 1.20 कोटी आहे आणि 130 कोटींहून व्ह्यूज चॅनेल्सना मिळाले आहेत. आता ब्लॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या संदर्भात गुप्तचर संस्था काम करत आहेत. त्यामुळे अशी अधिकाधिक चॅनेल्स ब्लॉक केली जातील. आम्हाला तुमच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे, असंदेखील चंद्रा म्हणाले. हे वाचा-तुमचं Gmail Account हॅक तर नाही झालं? सोप्या स्टेप्सने असं तपासा, राहाल अलर्ट मंत्रालयानं ब्लॉक केलेली सर्व 35 अकाउंट्स पाकिस्तानातून ऑपरेट होत होती. चार को-ऑर्डिनेटेड डिसइन्फॉर्मेशन नेटवर्कचा (coordinated disinformation networks) भाग म्हणून त्यांची ओळख पटवली गेली होती. यामध्ये 14 यू-ट्यूब चॅनेल्स चालवणारं 'अपनी दुनिया नेटवर्क' आणि 13 यू-ट्यूब चॅनेल्स चालवणाऱ्या 'तल्हा फिल्म्स नेटवर्क'चा समावेश आहे. याशिवाय चार चॅनेलचा एक सेट आणि दोन चॅनेलचा सेटसुद्धा एकमेकांशी संबंधित असल्याचं आढळलं आहे. ही सर्व नेटवर्क्स भारतीय प्रेक्षकांसाठी खोट्या बातम्या पसरवण्याच्या उद्देशानं ऑपरेट केली जात होती. नेटवर्कचा भाग असलेली चॅनेल्स सामान्य हॅशटॅग (Hashtag) आणि एडिटिंग स्टाइल (Editing Style) वापरत होते. विशेष म्हणजे ही चॅनेल्स सर्वसामान्य व्यक्तींद्वारे ऑपरेट केली जात होती आणि ती एकमेकांच्या कंटेटला क्रॉस-प्रमोट करत होती. यातली काही यू-ट्यूब चॅनेल पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिन्यांचे अँकर्सही चालवत होते.
First published:

Tags: Twiter, YouTube Channel

पुढील बातम्या